file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- दुचाकीने पाठीमागील बाजुने समोर चाललेल्या दुचाकीला धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला.

शिवाजी पाटिलबा लांडगे (वय 68 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून अहमदनगर- दौंड महामार्गाने अरणगावातून जात होते.

त्यांना पाठीमागील बाजुने येणार्‍या दुचाकीस्वार शाम रतन भालसिंग (रा. वाळकी ता. नगर) याने त्याच्याकडील दुचाकीची धडक दिली. या अपघातात शिवाजी लांडगे गंभीर जखमी होऊन मयत झाले.

पवन दत्तू लांडगे (वय 28 रा. बाबुर्डी घुमट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी शाम भालसिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.