अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीष वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.(Elderly woman beaten)

ही घटना दिनांक २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल हसन खान वय वर्षे ५० राहणार समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान तस्लीम बेगम खान या त्यांच्या घरात होत्या.

त्यावेळी तेथे आरोपी सतिष वाघ व इतर तीन अनोळखी इसम हे तस्लीम बेगम खान यांच्या घरात घुसले. आणि त्यांना म्हणाले कि, तूमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या.

नाहीतर तूमचे घर माझ्या नावावर करून द्या. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने आरोपींनी तस्लीम बेगम खान यांना लाथा बूक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तस्लीम बेगम खान यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आणि घडलेला प्रकार पोलिसां समक्ष कथन केला.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी सतिष आनंदा वाघ राहणार अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी तसेच फॅक्टरी परिसरातील इतर तिघेजण अशा एकूण चार जणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक, नाईक हे करीत आहेत.