अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दोन सहकार साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात श्रीगोंदा तालुक्यातील महर्षी स्व.

शिवाजीराव नागवडे सहकारी (श्रीगोंदा) साखर कारखाना आणि सहकार महर्षी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे

. दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नागवडे कारखान्यांसाठी 13 डिसेंबरपासून उमेदवार अर्ज तर कुकडीसाठी 10 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

तर कुकडी कारखान्यांसाठी 10 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होणार असून 16 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

नागवडे कारखान्यांसाठी 14 जानेवारीला मतदान होणार आहे. तर कुकडी कारखांन्यासाठी 16 जानेवारीला मतदानाची प्रक्रिया होणार आहे. कुकडीपेक्षा नागवडे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूकमध्ये चुरस पहायला मिळणार आहे