Ahmednagar News : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. बाकीच्यांचा प्रचार जोरदार सुरु आहे. नगर, शिर्डी लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होईल. इतर ठिकाणचे टप्पे वेगवेगेळे आहेत. दरम्यान या निवडणुकांत उमेदवाराला मोठा खर्च करावा लागतो.
निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा चहापान अन् जेवणाचा खर्च व इतर काही गोष्टी पाहता मोठा खर्च होतो. यासाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे.२०२२ पर्यंत ७० लाखांची मर्यादा होती.
परंतु वाढती महागाई पाहता यावेळी मात्र ९५ लाखांची मर्यादा घालून दिली आहे. यंदेह बैठका, रॅली, सभा आणि जाहिराती, पोस्टर्स, वाहनांचा खर्च यामध्ये सामाविष्ट आहे.
आता लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाचे दर निश्चित केले आहेत. यानुसार खर्चाचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवाराला राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडू शकतो. उमेदवारी अर्ज भरताना रिटर्निंग ऑफसरकडून खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्या रजिस्टरमध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च, दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य असते.
खर्चाचा प्रकार
व्हेज थाळी स्पेशल – 180
नॉनव्हेज थाळी – 240
बिर्याणी – 150
पोहे – 20
चहा – 10
कॉफी – 15
वडापाव – 15
भजे प्लेट – 20
पाणी बाटली – 17
मिसळपाव – 60
पाव भाजी – 60
फुलांचा मोठा हार – 80
गांधी टोपी – 10
फेटा – 190
ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती) – 500