विधानसभा निवडणूक

23 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्रामध्ये घडली होती मोठी नाट्यमय राजकीय घटना! 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल; मतदार कुणाला देतील कौल?

Published by
Ajay Patil

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:- उद्या म्हणजे 23 नोव्हेंबर 2024 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा असून उद्या विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे व यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे? याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

उद्या महाराष्ट्राच्या लागणाऱ्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले असून उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.परंतु उद्या असणाऱ्या 23 नोव्हेंबर या तारखेचा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नाट्यमय घडामोडीशी खूप मोठा संबंध आहे व या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी घडणार नाही अशी नाट्यमय घडामोडी घडली होती व ती म्हणजे सर्वत्र गाजलेली पहाटेचा शपथविधी होय. आता आपल्याला आठवण आली असेल की 23 नोव्हेंबर 2019 रोजी काय घडले होते.

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे उरकला होता शपथविधी
आपल्याला माहित आहे की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच 2019 यावर्षीची जी विधानसभा निवडणूक झाली होती तेव्हा त्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये नेमके सत्ता कोण स्थापन करणार? याबाबत मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता व अनपेक्षितरित्या देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती व ती शपथ 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे घेतली गेली होती.

ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. योगायोगाने 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर आता या 23 तारखेची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

अवघे साडेतीन दिवस टिकले होते सरकार
2019 या वर्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर राज्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत पेचप्रसंग निर्माण झाला होता व बरेच दिवस चर्चा झाल्यानंतर देखील अनपेक्षित घटना घडली होती व ती म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी संपूर्ण राज्य झोपेत असताना भल्या पहाटे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहाटेचा शपथविधी हा सर्वात जास्त नाट्यमय राजकीय घडामोडींपैकी एक मानला जातो. सकाळी सकाळी स्थापन झालेले फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार मात्र अवघे साडेतीन दिवस टिकले व संपूर्ण देशभर मात्र हे सरकार चर्चेत राहिले.

आता पुन्हा 23 नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरली असून यंदा याच वर्षी विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागणार आहे. नेमके याच दिवशी राज्यात कोणाची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. आपल्याला माहित आहे की 2019 यावर्षी ज्या काही निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली होती.

परंतु मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये घोडे बिनसले व शिवसेनेने भाजपपासून वेगळे होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन करून संसार थाटला व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती.

Ajay Patil