विधानसभा निवडणूक

Ahilyanagar Politics Breaking : खा. सुजय विखे-आ. राम शिंदेंची साडेतीन तास मॅरेथॉन बैठक ! बैठकीत सर्वात मोठा निर्णय, राजकीय समीकरणे पुन्हा बदलली

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahilyanagar Politics : अहमदनगर लोकसभेला काही दिवस बाकी असल्यापासूनच भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत होता. यात सर्वात महत्वपूर्ण मानले जात होते ते म्हणजे आ. राम शिंदे यांची असणारी नाराजी. खा. सुजय विखे यांना सरळसरळ विरोध ते करत होते. विखे यांचे तिकीट फायनल झाल्यानंतर मात्र राम शिंदे यांनी चुप्पी साधली. पण त्यानंतर स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. राम शिंदे यांची भेट घेत चर्चा केली.

त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-शिंदे यांची एकत्रित बैठक घेत नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण आता आज मात्र या पार्श्वभूमीवर मोठी बातमी आली आहे. आज अहमदनगरमध्ये भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांमधील मतभेद आता दूर झाले असून त्यांचे आता मनोमिलन झाले आहे. भाजपकडून आज महत्त्वाची बैठक ‘अहमदनगर’ साठी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला सुजय विखे पाटील आणि राम शिंदे हे उपस्थित तर होतेच विशेष म्हणजे ही बैठक साडेतीन तास चालली. या बैठकीत अखेर दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाल्याने भाजपने अहमदनगरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळवले आहे. बैठकीनंतर खा. विखे व आ. शिंदे या दोघांनीही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले खा. सुजय विखे पाटील?
आमदार राम शिंदे आणि आम्ही आमच्यात मतभेद नव्हते तर काही समज-गैरसमज हे मधल्या काळामध्ये झाले होते. त्यावर सविस्तर चर्चा झालेली असून शिंदे यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला असून भाजपचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं त्यांनी आता सांगितले आहे.

त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये ज्या शंका कुशंका असतील त्या संदर्भात देखील चर्चा झालेल्या असून त्यावरही उपाययोजना होतील. आता सगळेच गैरसमज दूर झाले असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आ. राम शिंदे?
आ. राम शिंदे यांनी यावेळी म्हटले की, काही प्रश्न, अडीअडचणी होत्या. त्यामुळे लोक, कार्यकर्त्यांचं म्हणणे ऐकून घेणं आणि त्याला उत्तर देणं हीच भाजपची लोकशाही असल्याने ते काम आम्ही केले. आज तीन तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत खासदारांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतले असल्याचे शिंदे म्हणाले. मागील वेळेपेक्षा जास्त मतांनी आमचा खासदार निवडून येईल असेही आ. राम शिंदे म्हणाले.

Ahmednagarlive24 Office