विधानसभा निवडणूक

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये ‘वंचित’च्या उमेदवाराच्या कारवर हल्ला ! दगडे आली..पावडर तोंडात उडाली..काचा भर्रकन उडाल्या..’असा’ घडला थरार..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही हशींगेला पोहोचला आहे. याच धामधुमीत अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय.

अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी रात्री हा हल्ला केला. हा भ्याड हल्ला अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ झाला असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले.

सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्षा रूपवते बालंबाल बचावल्या. परंतु त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात सर्व गोष्टी समोर येतील.

नेमके काय घडले !
लोकसभेच्या निडवणुकीच्या अनुशंघाने रूपवते यांचा प्रचार दौरा सुरु आहे. त्या रात्री प्रचारात होत्या व आपला प्रचार आटोपून त्या सोमवारी रात्री कारने संगमनेरकडे पुन्हा माघारी निघाल्या होत्या. अकोले तालुक्यातील चीतळवेढे गावाजवळ आले असता काही अज्ञात व्यक्तींनी कारवर दगडफेक केली.

कारचालकाने सतर्कता दाखवत कार न थांबवता दामटवली. त्यामुळे त्या या हल्ल्यातून बचावल्या असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यानंतर लगेच हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

याप्रकरणी उत्कर्षा रुपवते यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. महिला उमेदवाराच्या कारवर दडफेक झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

..तर डोळ्यात गेल्या असत्या काचा
उत्कर्षा रुपवते यांनी या थरारक हल्ल्यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मी प्रचार पूर्ण करुन संगमनेरकडे परतत होते. त्यावेळी मी गाडीत फोनवर बोलत होते.

तेवढ्यात काही तरी आपटल्याचा आवाज आला व पावडर तोडांत गेली. त्यामागोमाग गाडीच्या काही काचा भर्रकन उडालेल्या दिसल्या. सुदैवाने या काचा डोळ्यात न केल्याने मी सुखरूप राहिले.

दरम्यान. या घटनेनंतर वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस फौफाटाही घटनास्थळी पोहोचला होता व त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली होती. या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते.

 

Ahmednagarlive24 Office