Ahmednagar Politics : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने अनेक घडामोडी आता घडत आहेत. राजकीय उलथापालथ, राजकीय स्थित्यंतरे सुरु झाली आहेत. आता अहमदनगर लोकसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडी यांचे राजकीय द्वंद्व रंगात आले असतानाच काँग्रेसच्या गळाला मोठा नेता लागला आहे.
राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळेच अस्तित्व ठेवणाऱ्या घनःश्याम शेलार यांनी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.
तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळावात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. यात काहींनी लोकसभा लढवण्याचा तर काहींनी आघाडी बरोबर राहण्याचा विचार व्यक्त केला.
त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घनःश्याम शेलार यांनी काॅग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला.तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी आ.थोरात म्हणाले, शेलार यांचे भवितव्य काॅग्रेस पक्षात उज्ज्वल होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यामाध्यातून कार्यकर्त्यांना केले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
लंके यांची ताकद वाढेल ?
घनःश्याम शेलार यांची श्रीगोंदे मतदारसंघात मोठी पकड आहे. मोठा कार्यकर्ता वर्ग त्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना याचा फायदा होईल असे म्हटले जात आहे.
श्रीगोंदे तालुक्यात सामाजिक, राजकीय कामगिरीमधून शेलार यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी देखील त्यांचे सख्य आहे. त्यामुळे आता श्रीगोंदे तालुक्यातील राजकीय समीकरणे बऱ्यापैकी बदलतील असे चित्र आहे.