Ahmednagar Politics : आ.लहामटे यांना एकाची तर अनेकांना विखेंची ऍलर्जी ! खा. लोखंडे यांच्या व्यासपिठावरून दोन नेते गायब, राजकीय जुगलबंदीत खासदार हतबल

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघात आता राजकीय वातावरणाने चांगलाच रंग धरला आहे. खा. लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीने प्रचार सुरु केला आहे. परंतु ही महायुतीचे आता खासदारांची व पालकमंत्री विखे पाटलांची डोकेदुखी ठरू लागली असल्याचे चित्र आहे.

महायुतीमुळे वरिष्ठ जरी एकत्र आले असले तरी खालच्या पातळीवर आयुष्यभर एकमेकांना विरोध करणारे नेते, कार्यकर्ते यांना मात्र हे अवघड जात आहे. तसेच इतर काही राजकीय गोष्टी विखे यांना जड जात असून आमदार लहामटे यांच्यामुळे खा.लोखंडे यांची काही बाबतीत गोची होऊ लागली आहे. याचा परिणाम खा. लोखंडे यांच्या अकोल्यातील मेळाव्यात दिसून आला.

नेत्यांच्या एकमेकांच्या ऍलर्जीने खा. लोखंडे हतबल?
आमदार लहामटे यांनी मेळाव्यास येण्याआधी सूचनावजा इशारा केला होता की, मी ज्या व्यासपिठावर असेल तेथे कोणाची बाजीरावकी चालणार नसून तेथे दहशत करणारे माणसे नकोत. लोखंडे यांनी त्यांचा शब्द पाळला.

त्यामुळे स्टेजवर अकोल्यातील तो बडा नेता दिसलाच नाही. त्याला इतरत्र कुठेतरी थांबून सभा ऐकावी लागली. तर दुसरीकडे आठवले यांचे तिकीट कापण्यात राधाकृष्ण विखे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे मत वाकचौरे यांनी व्यक्त केले असल्याने विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे आदींसारखे रिपाईचा एकही नेता महायुतीच्या स्टेजवर आलेला पाहायला मिळाला नाही.

जेथे विखे तेथे आम्ही जाणार नाही अशी भूमिका रिपाईने घेतली असल्याने त्याचा फटका लोखंडे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. लहामटे यांच्या भूमिकेने अकोल्यातील काही नेते लोखंडे यांच्यावर नाराज होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आ. लहामटे म्हणतात ..तर मी लोखंडे यांना मदत करेल, पण जनतेचे काय?
यावेळी बोलताना आ. लहामटे यांनी म्हटले की, तोलार खिंड फोडणे, शहापूर मार्गे मुंबई रस्ता, बिताका सारखी धरणे आदी कामे येणार्‍या काळात नितीन गडकरी यांच्याकडून करुन घेणे असल्याने ही कामे करण्यासाठी मी लोखंडे यांना फुल सपोर्ट करेल.

परंतु ही भूमिका आमदारांची झाली पण जनतेचे काय गेली १० वर्षे लोखंडे खासदार होते पण त्यांना अद्यापही अनेक मतदार ओळखत नाहीत अशी तक्रार काही लोक करत असतात तर मग हे जनतेस मंजूर होईल का असाही एक प्रश्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe