विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेतून शिवसेनेच्या मातब्बर नेत्याने भरला खासदारकीचा अर्ज ! आघाडीत बिघाडी की बंडखोरी? विखे, लंकेंपुढे आव्हान

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होऊ लागली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यात भाजपचे खा. सुजय विखे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

आज निलेश लंके अर्ज भरतील अशी माहिती आहे. सुजय विखे हे महायुतीचे व निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. परंतु आता यात मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. अहमदनगर लोकसभेतून आणखी एक उमेदवारी अर्ज भरला गेला आहे.

व हा अर्ज महाविकास आघाडीचाच एक घटक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी भरला आहे. त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष समाविष्ट असून तो महत्वाचा घटक आहे. असे असतानाही उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी अर्ज भरल्यामुळे राजकीय तर्क कुतर्क वाढले आहेत.

दरम्यान आपण आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असे जाधव यांनी दूरध्वनीवरून सांगितल्याची बातमी एका मीडियाने दिली आहे. धनशक्ती आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात ही लढाई असून त्यांना चितपट करण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला असे ते म्हणाले आहेत.

अपक्ष भरला फॉर्म
गिरीश जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत नेत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु असे असले तरी ते सध्या ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत असल्याने त्यांनी दाखल केलेल्या अर्जामुळे शिवसेनेत बंडखोरी तर झाली नाही ना? चर्चांना पेव फुटले आहे.

दरम्यान त्यांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे मोठा आवाहन उभे राहू शकते असे म्हटले जात आहे.

 

Ahmednagarlive24 Office