विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : पैसे वाटपाची खबर लागताच अहमदनगरमधील ‘त्या’ बंगल्यावर छापा ! रात्री एक पर्यंत तपासणी, आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत मतदान सुरू असतांना पाच वाजे दरम्यान शहरातील स्व. रामदास पाटील धुमाळ यांच्या निवासस्थानी काही तरुण मतदारांना पैशाचे आमिष दाखवून गर्दी केली असल्याचे भरारी पथकाला माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा मारण्यात आला.

या बंगल्याची भरारी पथक, पोलीस अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन करत तब्बल सात तास रात्री एक वाजेपर्यंत तपासणी केली असता या पथकातील अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे काही आढळले नाही.

काल सोमवार दि.१३मे रोजी राहुरी शहरात मतदान सुरु असताना स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांच्या बंगल्यात कोणीतरी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून पैसे वाटप करत असल्याची खबर लागताच या ठिकाणी भरारी पथकाने जाऊन छापा मारला.

सायंकाळी पाच वाजे दरम्यान धुमाळ यांच्या बंगल्यावर भरारी पथकाने व पोलिसांनी छापा मारला होता. सायंकाळी पाच ते रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी झाडाझडती सुरू होती. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आर्थिक देवाण-घेवाण न झाल्याचे निष्पन्न झाले.

यावर बोलताना आ. तनपुरे म्हणाले, दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया होत असताना तसेच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना सत्ताधाऱ्यांकडून खोडसळपणाचा प्रकार होत आहे. भाजपाकडून रडीचा डाव खेळला जात आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल झाला. आमच्याकडेही काही व्हिडिओ आले आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण मतदारांना झाली आहे. त्यंत चांगली राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या स्व. धुमाळ यांचा नातू मंदार धुमाळ यांच्या बंगल्यावर हा निंदनीय प्रकार करण्यात आला आहे.

एका तपासी अधिकाऱ्याने सांगितले की, मतदारांच्या चिठ्ठ्या घेऊन पैसे वाटप होत असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनेच्या ठिकाणी आलो. काही तरुण गर्दी करत मतदाराकडून चिठ्ठ्या घेत होते.

आम्हाला पाहून ते पळुन गेले व सदर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे व तहसीलदारांना दिली असता त्यांनी याठिकाणी थांबून कारवाई करण्याचे सांगितले होते. बंगल्याची झाडाझडती घेतली असता कुठल्याही प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळून आले नाही. तर सदर घटनेचा शासकीय पंचासमोर पंचनामा करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे अशी माहिती एका मीडियाने दिली आहे.

Ahmednagarlive24 Office