Ahmednagar Politics : अखेर कार लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया आज संपली आहे. आज लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यंदाचा निकाल हा चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतरच देशात कोणाचे सरकार येते हे स्पष्ट होणार आहे.
पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीए बाजी मारते की काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी काही मोठा उलटफेर करते? हे निकालाच्या दिवशी समजणार आहे. 4 जूनला दुपारी चार वाजेपर्यंत जनतेचा कौल कोणाकडे असे हे समजू शकणार आहे.
तत्पूर्वी मात्र वेगवेगळे एक्झिट पोल समोर येत आहेत. टीव्ही 9 मराठीचा एक्झिट पोल देखील नुकताच समोर आला असून यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात या संदर्भात अंदाज बांधण्यात आला आहे.
टीव्ही नाईन च्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागांवर विजय मिळू शकतो. तर महाविकास आघाडीला 25 जागा मिळू शकतात. तसेच अपक्षला 1 जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला 14 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागा, भाजपाला 18 जागा, काँगेस 5 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या एक्झिट पोल मध्ये शून्य जागा देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण मध्य मोठा उलटफेर होण्याची शक्यता या एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर दक्षिण मध्ये यावेळी भाजपाचे सुजय विखे यांचा पराभव होऊ शकतो आणि या जागेवर शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आला आहे.
खरेतर नगर दक्षिणची जागा या निवडणुकीत विशेष चर्चेत राहिली आहे. यामुळे या जागेवर कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान या जागेवर निलेश लंके हे विजयी होऊ शकतात असा दावा एक्झिट पोल मध्ये केला जात आहे. तथापि, हा फक्त एक्झिट पोल आहे निकाल लागल्यानंतरच नेमके कोण विजयी होणार हे समजू शकणार आहे.