Ahmednagar Politics : पारनेरचा बिहार होतोय… दहशतीचे पाणी आता डोक्यावरून गेलंय.. ! विखेंना गोळी घालण्याच्या प्रकरणावरून पारनेरककर संतप्त

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : खा. सुजय विखे यांना गोळी मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. धमकी देणारा व त्याचे राजकीय संबंध ज्याच्याशी आहेत त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत गेल्या. आता आ. निलेश लंके यांच्या तालुक्यात पारनेरमध्येच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.

आज महायुतीतर्फे पारनेरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. दहशतीचा आता कळस झाला आहे, दहशतीचे पाणी आता डोक्यावरून गेलंय अशा संतप्त भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पारनेरचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना निवेदन दिले.

यावेळी राहुल शिंदे, काशिनाथ दाते, शिवाजी खिलारे, सचिन वराळ पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थतीत होते. यावेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, दहशतीचे प्रमाण पारनेर तालुक्यात वाढले आहे. अगदी ग्रामपंचायत निवडणुका असतील, किंवा सोसायट्या निवडणूक असतील या ठिकाणी दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले. पारनेर तालुका दहशतीच्या सावटाखाली जगत आहे.

परंतु आता या दहशतीचा अगदी कळस झाला आहे. पाणी डोक्यावरून गेलं आहे. त्यामुळे धमकी देणारा इसम नाना व त्याला त्या पद्धतीची ताकद देणारे राजकीय नेते यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला..
यावेळी आंदोलनकर्त्यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले, की पारनेर तालुक्यात असले प्रकार याआधीही झाले आहेत. आता येथे म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला जात आहे.गेली साडेचार वर्षे काळ सोकावला आहे. आता हा काळ सोकावू देऊ नये अशी मागणी आता प्रशासनाकडे असल्याचं ते म्हणाले.

मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?
आगामी निवडणुकांसाठी धमकावत मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न विरोधातील उमेदवार करत आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे सर्व लक्षात घेता पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली.

पारनेरचा बिहार होतोय
पारनेरमधील दहशत पाहता आता पारनेरचा बिहार होतोय का असा सवाल आता निर्माण झाला आहे. त्यामुळे असला दहशतवाद आता थांबला पाहिजे असे मत भाजप पारनेरच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe