Ahmednagar Politics : फडणवीसांचे लक्ष्य आमदारकीवर ! आले विखेंच्या सभेला अन दोन उमेदवार घोषित करून गेले, अजित दादांच्या जागेलाही घातला हात

Ahmednagarlive24 office
Published:
fadnvis

Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. पण यात सध्या भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष पुढील विधानसभेवरही असल्याचे दिसते.

देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी डॉ. विखेंचे कौतुक तर केलेच पण त्यांनी यावेळी दोन लाडक्या शिलेदारांना समोर आणत आमदारकीसाठी त्यांचे प्रमोशन केले.

यावेळी जनतेला उद्देशून बोलताना फडणवीस म्हणाले, तुम्ही मला आमदार-खासदार द्या मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करतो असे वक्तव्य करत त्यांनी कर्जत-जामखेडमधून आमदार प्रा. राम शिंदे तर शेजारच्या आष्टीमधून सुरेश धस यांचे येणाऱ्या विधानसभेसाठी प्रमोशन केले.

अजित दादांच्या जागेला हात ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे सध्या आष्टीमध्ये आमदार आहेत. तसेच रोहित पवार सोबत नसले तरी ती जागा राष्ट्रवादीने जिंकली होती असे असले तरी या दोन्ही जागेंसाठी फडणवीस यांनी आपलेच उमेदवार पुढे केले. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जातेय.

सभेत नेमके काय घडले?
जामखेडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदार शिंदे आणि धस या दोघांचीही जोरदार भाषणे झाली. त्यांनी आपल्या कामाचा आणि त्यासाठी फडणवीस यांनी केलेल्या मदतीचा लेखाजोखा मांडला.

आपल्या भागाच्या काही मागण्याही फडणवीस यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर फडणवीस यांनी आपल्या भाषणात हे दोघेही आपले लाडके असून येणाऱ्या विधानसभेसाठी माझ्या या दोन लाडक्या शिलेदारांना मते देऊन विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच त्यांनी यावेळी ही निवडणूक ग्रामपंचायतीची नसून देशाची असल्याने आपल्याला देशाचा नेता निवडायचा असतो. जो नेता देशाची सुरक्षा व विकास करू शकेल त्यांनाच सत्ता द्यायची असते.पंतप्रधान निवडणे म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ नसल्याचे विरोधकांना कुणीतरी समजावले पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe