विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : ‘माझ्या मुलाला मारायला, अपघात करायला त्यांनी पूजा घातली’; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपाने खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणूक आता संपलेल्या आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी अखेर बाजी मारली आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी आमदार नीलेश लंके यांच्यातील ही लढत प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी झाली, त्यात लंके यांचा विजय झाला.

शरद पवार यांची मिळालेली पॉवर, सामान्य लोकांमध्ये असलेला लंके यांचा प्रभाव, कोविड सेंटरमुळे राज्यात झालेला लौकिक आणि भाजप सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला रोष या सर्व बाबी लंके यांना विजयाकडे घेऊन गेल्या.

दरम्यान आता या निकालानंतर निलेश लंकेच्या आईंनी खळबळजनक आरोप केल्याने चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे व त्यासाठी मोठी पूजा घातल्याचे धक्कादायक आरोप आता लंकेच्या आईंनी केले आहेत. त्या एका मीडियाशी बोलत होत्या.

नेमके काय म्हणाल्या निलेश लंकेंच्या आई?
निवडणूक काळात आम्हाला भीती वाटून राहिलेली होती. आमचा पहिलवान बारीक आहे तर समोरचा पहिलवान मोठा होता. तसेच काही लोक म्हणायचे हे मोठे लोक आहेत मशीन मध्ये घोटाळा करू शकतेत.

इतकेच नव्हे तर कुठे अपघात व्हावा यासाठी मोठ मोठ्या पूजा घातल्या गेल्या असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय. माझ्या पुतण्याने मला समजावून सांगितले की अशा पूजाने कुणी मरत नसते त्यामुळे थोडा धीर आल्याचेही त्या म्हणाल्या. त्या एका मीडियाशी बोलत होत्या.

पवार साहेबांचा आशीर्वाद
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा कायम आशीर्वाद माझ्या लेकाला आहे. ते अनेकदा माझ्या घरी देखील आले आहेत. ते खूप त्याला मानतात असेही त्यांनी गौरवोद्गार शरद पवार यांच्याबद्दल काढले.

जनसंपर्क जिंकला
सर्वसामान्यांच्या गळ्यात हात घालून चालणारे ‘नेते’ म्हणून लंके यांची ओळख त्यांना कामी आली. सामान्यांशी थेट संपर्क जिंकला, असेच वर्णन या निकालाचे करावे लागणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवित डॉ. सुजय विखे यांची सत्ता खेचून आणली.

Ahmednagarlive24 Office