Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची प्रचंड गाजलेली निवडणूक अखेरीस काल ४ जूनला निकाली निघाली. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. यामध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी एकूण ६२४७९७ मतदान घेतले. तर सुजय विखे यांनी ५९५८६८ मतदान घेतले.
दरम्यान एकंदरीत आकडेवारीवर टाकली तर अनेक मतदार संघात सुजय विखे यांना फटका बसला. अनेक मतदार संघात त्यांची मागील वेळेपेक्षा यावेळी आकडेवारी घटलेली पाहायला मिळाली.
पारनेर, श्रीगोंदे, कर्जत जामखेड आदी ठिकाणांसह अगदी पोस्टल मधेही सुजय विखे यांना कमी मते मिळाली. आता पण दोघांनाही मतदार संघवाईज मिळालेली मते व सुराज्य विखे यांचे घटलेले मतदान आदी गोष्टी पाहुयात –
विधानसभानिहाय मतमोजणीचा अंतिम आकडा
विधानसभा निलेश लंके सुजय विखे
सुजय विखेंना २०१९ व २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पडलेली तालुकानिहाय मते
विधानसभा क्षेत्र २०१९ २०२४ मतदानात घट
नगर शहर १०८८६० १०५८४९ ३०११
• शेवगाव १२९९६८ १०६३९२ २३५७६
• राहुरी १२६७१३ १०६९०३ १९८१०
• पारनेर ११७०८१ ९२३४० २४७४१
• श्रीगोंदा १०९१०३ ८६२४९ २२८५४
• कर्जत-जामखेड १०५२३६ ९५८३५ ९४०१
• पोस्टल ७६९९ २३०० ५३९९