Ahmednagar Politics : लोकसभेचे पिक्चर क्लिअर ! नगरमधून २५ तर शिर्डीतून २० उमेदवार, ‘एमआयएम’ सह अपक्ष लंके यांची माघार, पहा सर्व उमेदवारांची यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील पिक्चर आता क्लिअर झाले आहे. नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघात असणारे उमेदवार आता फायनल झाले आहेत. काल (२९ एप्रिल) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास १३ उमेदवारांनी माघार घेतली असून ४५ जण मात्र रिंगणात आहेत.

यामध्ये नगर लोकसभेसाठी २५ तर शिर्डीतून २० उमेदवार असतील. शिर्डीत मात्र भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या विरोधात भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे हे नामसाधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात आहेत.

अहमदनगर मतदारसंघात एमआयएम, अपक्ष लंके यांची माघार
अहमदनगर मतदारसंघात एमआयएमने माघार घेतली असून महाविकास आघाडीचे निलेश ल॑के यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारानेही माघार घेतली आहे. “एमआयएम’चे परवेज शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून चर्चेत असलेले

नीलेश साहेबराव लँके यांनीही अर्ज मागे घेतला आहे. उद्धवसेनेचे अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सना सय्यद व संजय खामकर यांनी अर्ज मागे घेतले आहेत.

नगरमधून ‘हे’ उमेदवार मैदानात
सुजय विखे (भाजप), नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), उमाशंकर यादव (बहुजन समाज पार्टी), आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना), डॉ. कैलाश जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), रवींद्र कोठारी (राष्ट्रीय जनमंच), दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी), भागवत गायकवाड (समता पार्टी), मदन सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), रावसाहेब काळे (बहुजन मुक्त्ती पार्टी),

भाऊसाहेब वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पार्टी), अमोल पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र शिंदे (अपक्ष), मच्छिंद्र गावडे (अपक्ष), गंगाधर कोळेकर (अपक्ष), नवशाद शेख (अपक्ष), प्रवीण दळवी (अपक्ष), सूर्यभान लांबे (अपक्ष), अनिल शेकटकर (अपक्ष), अॅड. महंमद जमीर शेख (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), गोरख आळेकर (अपक्ष)

शिर्डीत ‘हे’ उमेदवार रिंगणात
भाऊसाहेब वाकचौरे (उद्धवसेना), सदाशिव लोखंडे (शिंदेसेना), चंद्रकांत दोंदे (अपक्ष), अभिजित पोटे (अपक्ष), भारत भोसले (समता पार्टी), नितीन पोळ (बहुजन भारत पार्टी), गोरक्ष बागुल (अपक्ष), अॅड. सिद्धार्थ बोधक (अपक्ष), अशोक आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतीश पवार (अपक्ष),

संजय भालेराव (अपक्ष), रामचंद्र जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर कदम (अपक्ष), भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष), प्रशांत निकम (अपक्ष), नचिकेत खरात (अपक्ष), राजेंद्र वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), रवींद्र स्वामी (अपक्ष), विजयकुमार खाजेकर (अपक्ष)