Ahmednagar Politics News : आज अर्थातच 19 एप्रिल 2024 ला अठराव्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदाची निवडणूक ही देशात सात टप्प्यात होणार आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर आपल्या राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
काल अर्थातच 18 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी महोदय तथा अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनात शिर्डी आणि नगर दक्षिण साठी उमेदवारी अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. दरम्यान याच उमेदवारी अर्ज बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी नगर दक्षिणसाठी 42 अर्ज विकले गेले आहेत तर शिर्डी साठी 31 अर्ज विकले गेले आहेत.
खासदार डॉ. सुजय विखे, आमदार प्राजक्त तनपुरे, नितीन उदमले इत्यादींसाठी प्रतिनिधींनी अर्ज घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजून नगर दक्षिण साठी किंवा शिर्डी साठी कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. दरम्यान आता आपण शिर्डीमधून तथा नगर मधून कोणी-कोणी अर्ज घेतले आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणी-कोणी घेतलेत अर्ज
सुजय विखे यांच्यासाठी त्यांचे प्रतिनिधी अभिजीत दिवटे यांनी 2 अर्ज घेतले आहेत.
रावसाहेब शंकर काळे (रा.नालेगाव) यांनी स्वत:साठी एक अर्ज, अनिल गणपत शेकटकर (रा.सिद्धार्थनगर)
सुभाष बन्सी अल्हाट (रा. पिंपळगाव उज्जैन्नी,ता. नगर)
कालीराम बहिरू पोपळघट (रा. साकूर, ता. संगमनेर) दोन अर्ज
अशोक भानुदास तांबे (सलाबतपूर, ता. नेवासे) यांनी दोन अर्ज
राणू साहेबराव दळवी (मुक्तापूर, नेवासे) यांनी दोन अर्ज
विलास सावजी लाकूडझोडे (उख्खलगाव, श्रीगोंदे) यांनी दोन अर्ज
शिवाजी वामनराव डमाळे (रा.केडगाव)
तुकाराम बाबूराव कोकरे (रा.चिंभळा, श्रीगोंदे) दोन अर्ज
अमोल दिगंबर गुलदगड (आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ४ अर्ज घेतलेत)
शिरीष तुकाराम जाधव (रा. दिल्लीगेट) यांनी १ अर्ज
दत्तात्रय अप्पासाहेब वाघुंडे (रा. साकत) यांनी एक अर्ज
अशोक दामोदर ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी एक अर्ज
सुदर्शन लक्ष्मण शितोळे (श्रीरामपूर) यांनी दोन अर्ज
सुधीर नाथा वैरागर (रा. घोडेगाव, ता. नेवासे) यांनी १ अर्ज
मंगल भुजबळ (रा. अहमदनगर) यांनी एक अर्ज
छगन भिकाजी पानसरे (मजले चिंचोली, नेवासे) यांनी ४ अर्ज
ज्ञानदेव कारभारी पाडळे (रा. देवराव, नेवासे) यांनी ४ अर्ज
संजय पांडुरंग अडोळे यांनी २ अर्ज (नितीन नवनाथ उदमलेयांच्यासाठी घेतलेत)
यशंवत राया म्हस्के (रा.श्रीरामपूर) स्वत:साठी २ अर्ज
अर्ज मागे घेण्याची मुदत
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीसाठी 18 जणांनी 31 अर्ज घेतले आहेत, तर नगर दक्षिण साठी 22 जणांनी 42 अर्ज घेतले आहेत. नगर आणि शिर्डी साठी कालपासून म्हणजेच 18 एप्रिल पासून अर्ज विक्री आणि स्वीकृती ला सुरुवात झाली आहे. शिर्डीसाठी अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनात तर नगर दक्षिण साठी जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनात अर्ज स्वीकारले जाणार अशी माहिती समोर आली आहे.
तसेच अर्ज स्वीकारण्याची मुदत 25 एप्रिल 2024 पर्यंत राहणार आहे. 26 एप्रिलला अर्जांची छाननी होणार आहे. तसेच माघार घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत दिली जाणार आहे. यामुळे आता 29 एप्रिल नंतरच प्रत्यक्षात नगर दक्षिणच्या तथा शिर्डीच्या आखाड्यात कोण-कोण उतरत हे क्लिअर होऊ शकणार आहे.