विधानसभा निवडणूक

शिंदे गटाच्या ‘या’ खासदारावर गंभीर आरोप, पदाचा गैरवापर करत करोडो रुपयांचे अनुदान हडपले !

Published by
Tejas B Shelar

Ahmednagar Politics News : अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात रोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले आहेत.

दरम्यान महायुतीचे शिर्डीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच काही गंभीर आरोप झाले आहेत.

त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत करोडो रुपयांचे अनुदान हडपले असल्याचे आरोप त्यांच्यावर होत असून यामुळे लोखंडे अडचणीत आले आहेत. मतदानासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी असून लोखंडे हे सध्या प्रचारात दंग आहेत.

अशातच त्यांच्यावर स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते अनिल घनवट यांनी खासदार लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रोडचे अनुदान हडपले असल्याचा आरोप केला आहे.

घनवट यांनी सांगितले की, खेमानंद दूध आणि कृषी प्रोड्यूसर कंपनी नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई या संस्थेत लोखंडे यांच्या कुटुंबातील पाच जण संचालक आहेत. तसेच या संस्थेच्या सदस्यपदी कुटुंबातीलच इतर दहा जण सदस्य आहेत.

लोखंडे यांची पत्नी – नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा – प्रशांत सदाशिव लोखंडे, सून – प्रियांका प्रशांत लोखंडे, मुलगा – राज सदाशिव लोखंडे, सून – अश्विनी राज लोखंडे हे या कंपनीच्या संचालक पदी आहेत.

मात्र संचालक पदावर एका कुटुंबातील दोन व्यक्ती देखील असू शकत नाही असा नियम आहे. परंतु, नियमांना बगल देत या कंपनीला केंद्र शासनाने ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज दिले गेले आहे. तसेच, त्यापैकी १६ कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे, जे की पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

दुसरीकडे, सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना हा नियम दाखवून कर्ज आणि अनुदान नाकारले जात असल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे विद्यमान खासदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे अनुदान हडप केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची देखील त्यांनी यावेळी मागणी केली आहे. दुसरीकडे खासदार लोखंडे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. सदर अनुदान हे नियमात बसत असून आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत असे यावेळी लोखंडे यांनी म्हटले आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar