Ahmednagar Politics : मतदानानंतर नीलेश लंके पुन्हा अजित दादांशी संपर्क करणार..! महायुतीत संभ्रम तर अनेकांची धाकधूक वाढली…

Ahmednagarlive24 office
Published:
nilesh lanke

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुकांआधी व निवडणूक जाहीर झाल्यानंतर अहमदनगरमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. वरच्या पातळीवर झालेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम खाली देखील पाहायला मिळाला.

यातील एक महत्वपूर्ण घडामोड झाली ती म्हणजे अजित पवार गटाचे आमदार व अजित दादांचे विश्वासू मानले जाणारे निलेश लंके हे अजित दादांची साथ सोडून अर्थात महायुतीची साथ सोडून शरद पवार गटात आले. त्यामुळे पारनेरमधून महायुतीमध्ये अनेक आमदारकीसाठी इच्छुक निर्माण झाले.

परंतु आता काल (दि.१० मे) अजित दादांनी पारनेरमधील सभेत ज्या पद्धतीने निलेश लंके यांना दम दिला व त्यानंतर निलेश लंके यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानंतर अनेक चर्चा, तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

अजित दादांच्या खडसवण्यावर निलेश लंके काय म्हणाले?
अजितदादांना संपर्क करतो. निवडणूक होऊ द्या असे म्हणत लंके पुढे म्हणाले की, याबाबत मी अजितदादांना विचारणार असून त्यासंदर्भात कॉल ही करणार आहे. दोन दिवसांत मतदान होईल ते एकदा झाले की, अजित दादांना संपर्क करणार असल्याचेही ते म्हणाले.

पुढे बोलताना लंके म्हणाले, दादा सभेत कसे बोलले ते एकदा आपण पहिले पाहिजे. काहींनी खालून चिठ्ठ्या दिल्यानंतर दादांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यावर त्यावेळेस उमेदवाराच्या बाजूने बोलणेच अपेक्षित असल्याचे लंके म्हणालेत.

काय म्हणाले होते अजित पवार
पारनेरमध्ये सभेत अजित पवारांनी निलेश लंके यांच्यावर तोफ डागली. तसेच ‘नीलेश बेटा, तुझा बंदोबस्तच करतोच’, ‘तू किस झाड पत्ती है’, तसेच माझ्या नादाला लागणाऱ्यांचा मी बंदोबस्त करतो असेही ते म्हणले होते. तसेच इतर मुद्देही मांडले होते.

महायुतीत धकधक
सध्या निलेश लंके हे शरद पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीमधील आमदारकीसाठी व लंके विरोधकांचाच आपोआप रस्ता मोकळा झाला होता. परंतु आता निवडणूक होऊ द्या, अजित पवारांना भेटतो, संपर्क करतो असे जे लंके म्हणाले आहेत

त्यामुळे या लोकांची धाकधूक वाढली असल्याची चर्चा आहे. जर पुन्हा एकदा दादांना मनवण्यात लंके यशस्वी झाले तर आगामी राजकीय गणिते पुन्हा बदलू शकतात त्यामुळे या लोकांची चलबिचल वाढली असल्याचे बोलले जात आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe