विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : निलेश लंके यांना नाही मिळणार आमदारकीची पेन्शन, केली ‘ही’ चूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : जवळपास वर्षभरापासून अहमदनगरचे राजकारण माजी आ. निलेश लंके यांच्या अवतीभोवती खेळत आहे. निलेश लंके यांनी मागील विधानसभेला पारनेर मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला व ते आमदार झाले.

यंदाच्या २०२४ च्या लोकसभेला ते शरद पवार गटाकडून निवडणुकीस उभे राहिले. भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांच्याशी त्यांचा सामना झाला. येत्या ४ जून ला निकाल लागेलच. परंतु आता त्यांच्या आमदारकीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा लोकसभेला उभे राहण्याआधी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला होता.

त्यांचा हा राजीनामा १० एप्रिल रोजी अध्यक्षांनी स्वीकारला आहे. म्हणजेच आता निलेश लंके हे आमदार राहिले नाहीत. आता त्याबाबतच एक आणखी महत्वाची माहिती समजली आहे की, निलेश लंके यांना आपल्या आमदारकीची पेन्शन मिळणार नाही. प्रत्येक आमदाराला ही पेंशन मिळत असते. परंतु निलेश लंके याना ती मिळणार नाही.

का नाही मिळणार पेन्शन ?
निलेश लंके यांना आमदारकीची पेन्शन मिळणार नाही. त्याचे कारण असे की, त्यांनी आपल्या आमदारकीचा कार्यकाळ संपूर्ण पूर्ण केला नाही. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला. त्यामुळे हा कार्यकाळ पूर्ण होऊ न शकल्याने त्यांना पेन्शन मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच त्यांच्या या रिक्त झालेल्या पारनेर विधानसभेसाठी जागा रिक्त झालेली असली तरी पोटनिवडणूक होणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे आता कालावधीही कमी असल्याने या जागेवर पोट निवडणूक होणार नसल्याची माहिती समजली आहे.

आमदारांना पेन्शन किती मिळते?
प्रत्येक आमदाराला पेन्शन मिळते. आमदाराचे निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबाला देखील पेन्शन दिली जाते. साधारणपणे माजी आमदाराला प्रति महिना 50 हजार रुपये निवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये देखील एखादा आमदाराने जर एकापेक्षा जास्त टर्म आमदारकी पार पाडली असेल तर त्याला पन्नास हजार रुपयांपेक्षा प्रत्येक टर्म करता दोन हजार रुपये वाढत जातात.

Ahmednagarlive24 Office