Ahmednagar Politics : निलेश लंकेचं ‘नेते’ ! सुजय विखेंचा पराभव, पहा आकडेवारी

Pragati
Published:
MLA Nilesh Lanke

Ahmednagar Politics :  लोकसभेला अहमदनगर मतदार संघाची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. निवडणूक झाल्यापासूनच कोण विजयी होणार याचे अंदाज बांधले जात होते. दरम्यान आज ४ जूनला ही प्रतीक्षा संपली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निकाल समोर आला आहे.

ही बातमी बनवेपर्यंत निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात तब्बल 28,224 मतांचा फरक आहे. लंके यांचे हे लीड तोडणे विखेंना अशक्य असल्याने निलेश लंके यांचा विजय निश्चित झाला आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे विजयच्या जवळ पोहोचले आहेत. निलेश लंके यांना 28 हजार मतांची आघाडी होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार सायंकाळी साडेसहा वाजता निलेश लंके त्यांना 4,61,456 (+ 28224) तर सुजय विखे यांना 4,33,232  इतकी मते होती.

सुरवातीला जवळपास 15 व्या फेरीपर्यंत विखे हे आघाडीवर दिसत होते. परंतु त्यानंतर चित्र पालटले. त्यानंतर लंके यांनी आघाडी घेतली. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अगदी मतमोजणीपर्यंत या जागेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते.

लंके व विखे या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचा दावा केला होता. अगदीच कांटे की टक्कर झालेल्या या निवडणुकीचा अखेर निकाल लागला असून निलेश लंके हे विजयी झाले आहेत.

अफवांचा बाजार
आज दिवसभर सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले होते. मतांच्या आकडेवारीबाबत संभ्रम पसरवण्यात येत होता. खोटी आकडेवारी पसरवली जात होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe