Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा राजकीय भूकंप ! ‘तो’ दिग्गज नेता शरद पवार गटाच्या वाटेवर

Ahmednagarlive24 office
Published:
sharad pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. लोकसभेची निवडणूक जसजशी तोंडावर येत आहे तसतशी या घडामोडी आणखी वाढत आहेत.

या घडामोडींमागे आगामी विधानसभेची देखील किनार आहे यात शंकाच नाही. आता अहमदनगर जिल्ह्यातील एक दिग्गज नेता लवकरच शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. हे नेते म्हणजे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस हे आहेत.

भोस यांनी नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी ते काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, ‘रयत’मधील शिक्षकांच्या प्रश्नांसदर्भात शरद पवार यांना भेटलो होतो. गुरुवारी (११ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया बाबासाहेब भोस यांनी दिली.

नागवडे कारखान्याच्या निवडणुकीपासून भोस यांनी नागवडे गटासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र, मागील महिन्यात अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी नागवडे यांच्या आग्रहाखातर भोस यांनीही हाती ‘घड्याळ’ बांधले. मात्र, मागील आठवड्यात नागवडे यांनी ढोकराई फाटा येथे आयोजित राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे नियोजित अध्यक्ष असतानाही भोस अनुपस्थित राहिले.

दरम्यान, शुक्रवारी (५ एप्रिल) भोस यांनी पवार यांची त्यांच्या पुण्यातील गोविंदबाग निवासस्थानी घेतली. या भेटीमुळे भोस पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शरद पवार गटाला मिळेल ताकद
भोस यांची तालुक्यात मोठी ताकद आहे. त्यांच्या वलयाचा मोठा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो. आगामी निवडणूक पाहता हा प्रवेश झाला तर त्याचा फायदा नक्कीच शरद पवार गटाला होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भोस यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या या चर्चाच राहतात की ते खरोखर पक्षप्रवेश करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe