Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणूक १३ मे ला संपन्न झाली. खा. सुजय विखे व निलेश लंके यांचे राजकीय भविष्य मतपेट्यांत बंदिस्त झाले. आता येत्या ४ जून ला मतमोजणी होईल व भावी खासदार कोण होईल याची उत्सुकताही संपेल.
सध्या दोघांचेही समर्थक विजय आमचाच असे म्हणत फटाके फोडतानाही दिसत आहेत. परंतु हा निकाल लागेल तेव्हा लागणारच आहे परंतु तोपर्यंत उमेदवारांसह जगताप-कर्डीले, शिंदे-पाचपुते-राजळे हे नेते टेन्शन मध्ये राहतील असे सध्या लोक म्हणतायेत.
सध्या मतदान झाले आहे व निकाल येईपर्यंत कट्ट्यावर, पारावर नागरिक वेगवेगळ्या गोष्टींचा किस पाडताना दिसत आहेत. यात ते कोणता विषय घेतील ते सांगता येणे कठीण. आता निकाल विखेंचा, टेन्शनमध्ये आलेत जगताप-कर्डीले, शिंदे-पाचपुते-राजळे अशी चर्चा नागरिक करताना दिसतायेत.
माजी आ. शिवाजी कर्डीले, आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, आ. राम शिंदे यांनी महायुतीचे घटक म्हणून सुजय विखे यांचा जोरदार प्रचार केला. त्यांनी प्रचारात कसलीही कसर सोडली नाही हे देखील खरे. पण सध्या फाईट एकदम टाईट झाली असल्याने निकालानंतर अनेक गोष्टी भाजप श्रेष्ठी तपासतील असे हे लोक म्हणतायेत.
अर्थात कोणत्या मतदार संघात लीड मिळाले किंवा कुठे मताधिक्य अगदीच कमी राहिले हे पाहिले जाईल. तसेच मध्यंतरी असेही चर्चिले जात होते की, ज्या भागात लीड भेटेल त्या भागातील नेत्यास आमदारकीचे तिकीट मिळवण्यात अडचण येणार नाही.
म्हणजेच ही जी जगताप-कर्डीले, शिंदे-पाचपुते-राजळे मंडळी आहे ही आमदारकीच्या तिकिटासाठी आहे उत्सुक, पण महायुतीची भाऊगर्दी पाहता चान्स कुणाला भेटेल हे सांगता येणे कठीण. पण जर लोकसभेला लीड दिलेले असेल तर पुढचा मार्ग सोपा होईल. हा नियम महाविकास आघाडीतही लागू होईल.
त्यामुळे निकालानंतर कोणताही उमेदवार असो व त्याचा विजय असो किंवा इतर काही निकाल असो विश्लेषण तर होणारच. त्यामुळे येणाऱ्या निकालाने जितकी धाकधुकी उमेदवारांची वाढली आहे तितकीच धाकधुकी राजकीय नेत्यांची वाढलीये कारण त्यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत अशी चर्चा हे लोक करतायेत.