Ahmednagar Politics : सत्यजित तांबे सांगा कुणाचे ! काँग्रेसचे की बंडखोर नेत्यांचे.. ‘त्या’ घडामोडींमुळे आ. थोरातांच्या भाच्याभोवती राजकीय ट्विस्ट

Ahmednagarlive24 office
Published:
Satyajit Tambe

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या तथा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत. सध्या कोण कुणाबरोबर किंवा कोण कुणाला सपोर्ट करेल याबाबत साशंकता असते. दरम्यान अहमदनगरच्या राजकारणात सुशिक्षित व सुसंस्कृत म्हणून आ. सत्यजित तांबे ओळखले जातात.

ते व त्यांचे घराणे कट्टर काँग्रेसवासी. त्यांचे मामाश्री अर्थात बाळासाहेब थोरात हे काँग्रेसही किती एकनिष्ठ आहेत हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक. परंतु मागील काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांची राजकीय भूमिका नेमकी काय आहे सध्यातरी कुणाच्या लक्षात येत नाहीये. शिकसहक पदवीधर वेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली नसतानाही त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली ते सर्वश्रुत आहे.

दरम्यान त्यानंतरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आमच्या मनामनात काँग्रेस आहे असे सांगितले. दरम्यान आता मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर विविध चर्चाना जोर येऊ शकतो. उदा. सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मोठे बंड केल्याचे दिसतेय.

त्यांचे जोरदार समर्थन आ. तांबे यांनी केले. तसेच शिर्डीतील काँग्रेसच्या कट्टर नेत्या उत्कर्षा रुपवते या वंचितमध्ये गेल्या. त्यांनी देखील आ. तांबे यांच्याशी चर्चा करण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे सध्या सत्यजित तांबे सांगा कुणाचे ! काँग्रेसचे की बंडखोर नेत्यांचे..असा सवाल नागरिकांना पडू लागला आहे.

विशाल पाटील यांचे समर्थन
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातील काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांची अनेक नेते समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना आमदार तांबे यांनी मात्र पाटील यांचे समर्थन करत त्यांची बाजू घेतली आहे.

आमदार तांबे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विशाल पाटलांवर झालेल्या अन्यायाची तीव्रता फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच कळेल. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार करणे गरजेचे असून जकारणात कर्तृत्ववान युवक पाहिजेत असे मला वाटते असे पोस्ट मध्ये म्हटले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, वसंतदादा पाटलांचे या महाराष्ट्रावर अनंत उपकार असून त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज डॉक्टर, इंजीनियर्स यांची संख्या जास्त आहे. विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात सक्षम असल्याने त्यांना संधी देणे गरजेचेच असून अजूनही वेळ गेलेली नसल्याचे तांबे म्हणाले.

उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, आ. तांबे यांचे मार्गदर्शन घेणार
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत उत्कर्षा रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेत त्यात प्रवेशही केला. आता त्या लोकसभा लढवतील असे चित्र आहे. या प्रवेशानंतर त्यांनी एक वक्तव्य केले, शिर्डी लोकसभेचे पाणी, रस्ते, आरोग्य आदींसह अनेक मूलभूत प्रश्न असल्याने ते सोडवणे गरजेचे आहे.

आमचे सत्याजीत तांबे यांच्याशी घरगुती संबंध असल्याने निवडणुकीत कशा पद्धतीने पुढे जावे यासाठी त्यांचा सल्ला घेणार असल्याचे रुपवते म्हणाल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आशीर्वाद असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe