Ahmednagar Politics : निवडणूक झाली, टेन्शन संपले, लंके-विखे पर्यटनाला गेले ! मतमोजणीसाठी १२ दिवस, इकडे सगळेच गॅसवर

Ahmednagarlive24 office
Published:
lanke vikhe

Ahmednagar Politics : राज्यात बहुचर्चित झालेली अहमदनगरची लोकसभा निवडणूक पार पडली. खा. सुजय विखे-निलेश लंके यांची तुल्यबळ लढत पार पडली. आता याचा निकाल ४ जूनला येईल. तोपर्यंत तर्क-वितर्क, अंदाज-आडाखे मांडण्याचे काम सुरू आहे.

कार्यकर्ते भले गॅसवर आहेत व एकमेकांशी पैजाही लावत आहेत. विशेष म्हणजे दोन्हींकडून विजयाचा दावा केला जात असून उत्साही कार्यकर्ते काही ठिकाणी विजयाचे फलकही झळकवत आहेत. दरम्यान एकीकडे हे चित्र असले तरी उमेदवार विखे-लंके यांनी मात्र काही काळ पर्यटनाला जाण्यास पसंती दिली असल्याचे दिसते.

खा. सुजय विखे सध्या कुटुंबाला वेळ देत असून ते कुटुंबासह माहूर येथील देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले असून, सध्या ते कुटुंबासोबत असल्याचे सांगण्यात आले. विखे यांनी स्वतः देवदर्शनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. डॉ. सुजय विखे यांनी मतदान संपल्यानंतर कुटुंबाला वेळ देणे पसंत केले असल्याचे दिसते.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी मतदान संपल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवीचे दर्शन घेतले. त्यांनी मतदान संपल्यानंतर कांदा दरप्रश्नी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, आचारसंहिता सुरू असल्याने त्यांनी आंदोलन स्थगित केले. अर्थात निवडणुकीच्या टेन्शनमधून थोडे बाजूला येत उमेदवारांनी पर्यटन, देवदर्शन आदींला पसंती दिली असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर १३ मे रोजी मतदान झाले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतदान प्रक्रियेत ६६.६१ टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. २०१९ मध्ये ६४.८४ टक्के मतदान झाले होते

. त्यात तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. सर्वाधिक मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघात ७०.१३ टक्के मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारी राहुरी विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मतमोजणीसाठी १२ दिवस, अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून आधीच विजयाचे फलक
लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागणार असला तरी कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा करत आपापल्या उमेदवारांचे फलक लावले. त्यावर खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचे व महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचेही फलक लावण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News