Ahmednagar Politics : सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा शिंदेंचा नव्हे लंकेंचाच कार्यकर्ता? एकत्रित फोटो व्हायरल

Ahmednagarlive24 office
Updated:
nilesh lanke

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर जिल्हयाच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीये. याचे कारण म्हणजे खा. सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची दिलेली धमकी. एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.

यामध्ये सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे म्हटले जात असल्याचे ऐकू येत आहे. ही क्लिप कामोठ्यातील भरसभेत ऐकवण्यात आल्यानंतर विखे समर्थकांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

कुणी दिली होती धमकी?
ऑडिओ क्लिप मध्ये असणारा व्यक्ती हा माजी पंचायत समिती सदस्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचेही सोशल मीडियावर सांगितले जात आहे. ही व्यक्ती निवृत्ती (नाना) गाडगे असल्याचा आरोप देखील विखे समर्थक करत आहेत.

गाडगे यांची स्पष्टोक्ती
या आरोपानंतर गाडगे यांनी स्पष्टीकरण दिल आहे की, माझ्यावर होणारे आरोप खोटे असून माझा आणि राष्ट्रवादीचा, निलेश लंके प्रतिष्ठानसचा कलाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी शिंदे गटाचा असून सामाजिक काम करत असतो. ज्यांनी हे ऑडिओ व्हायरल केले आहे ते खोटे आहे. जो माझ्यावर असे आरोप करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करेल असेही ते म्हणाले आहेत. अर्थात या ऑडिओक्लिप मधील व्यक्ती ते नाहीत असे त्यांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावर गाडगे लंके यांचे एकत्रित फोटो व्हायरल
गाडगे यांनी मी शिंदे गटाचा असून राष्ट्रवादीचा, निलेश लंके प्रतिष्ठानसचा कलाही संबंध नसल्याचे सांगितल्यानंतर सोशल मीडियात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप रंगल्याचे पाहायला मिळाले. काही लोकांनी गाडगे व निलेश लंके यांचे एकत्रित फोटो व्हायरल केले. या दोघांचा संबंध असल्याचे लोक सोशल मीडियावर दावा करत होते.

गाडगेच्या भूमिकेविरोधात शिवसेनाही आक्रमक
निवृती गाडगे यांनी व्हीडीओ प्रसारीत करून मांडलेल्या भूमिकेविरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले आहे. गाडगे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. गाडगे यांचा विरोधी उमेदवारासमवेत असलेले फोटो तसेच खा. डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात केलेल्या टिकात्मक प्रतिक्रीयेचे पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुपूर्त केले आहेत.

एक षडयंत्र असल्याचा लंके समर्थकांचा दावा
दरम्यान प्रसारित होणारी क्लिप, लंके व गाडगे यांचे फोटो व्हायरल करणे या सर्व षडयंत्राचा एक भाग आहे. निवडणुकीत त्यांच्या विरोधात याचा वापर करण्याचे षडयंत्र असल्याचे लंके समर्थक सांगतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe