Ahmednagar Politics : खा. सुजय विखे व निलेश लंके यांचा सामना जोरदार रंगेल असे नागरिक म्हणतायेत. त्यादृष्टीने दोघेही तयारीला लागले असून पायाला भिंगरी लावून दोघेही उमेदवार अगदी जनसामान्यांपर्यंत जात प्रचार करत आहेत.
यात आपली बाजू समोर ठेवत एकमेक्नावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान आता खा. सुजय विखे यांनी आपण केलेल्या कामांची माहिती समोर ठेवत आहेत. पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विखे यांनी सर्वांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी देशाचा निकाल लागला आहे. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे असे वक्तव्य करत गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काय म्हणाले खा. सुजय विखे
सुजय विखे यांनी पारगाव येथे आपल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसेच त्यांनी मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले. तसेच ते म्हणाले की, विजय महायुतीचा होणार असल्याने विरोधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले.
तसेच मागील पाच वर्षांत लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केली. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्न मार्गी लागले. व्यक्तिगत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली. त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला असल्याचे विखे म्हणाले.
ते म्हणाले, विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता, केवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची माहिती लोकांना द्या. कोणतीही खोटी माहिती अथवा वाढवून काही सांगू नका.
आपण केलेली कामे अधिक आहेत. मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून विरोधकांचा कोणताही विचार करू नये, देशाचा निकाल लागला आहे. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून स्वीकारले असल्याचेही ते म्हणाले.