Ahmednagar Politics : होता प्रचाराचा भव्य कार्यक्रम पण कार्यकर्त्यांची दांडी ! लोकच न आल्याने कार्यक्रम रद्द करण्याची खा. लोखंडेंवर नामुष्की?

Ahmednagarlive24 office
Published:
lokhadne

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर जिल्ह्यात विविध राजकीय गणिते तयार होताना दिसतायेत. तर काही ठिकाणी उमेदवारांना रोषाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. दरम्यान आपलाच प्रचार कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची वेळ शिंदे गटाचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर आली.

लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियोजित वेळ होऊनही कार्यकर्त्यांसह मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे अखेरीस गर्दी न जमल्याने त्यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागलं अशी माहिती मिळाली आहे.

देवळाली प्रवरासह ३२ गावांसाठी देवळाली प्रवरा शहरात मिंधे गटाचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा प्रारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थित होणार होता. परंतु सभेच्या ठिकाणी अवघे दहा ते वीस कार्यकर्ते उपस्थित होते.

सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होईल, अशी आशा नेत्यांना होती. परंतु गर्दी न जमल्यामुळे अखेर कार्यालय व प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करावा लागला. या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती.

म्हणून विखे यांचे समर्थक दुपारपासून कार्यक्रमस्थळी हजर झाले होते. परंतु खासदार लोखंडे यांच्या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांसह मतदारांनी पाठ फिरवल्याची चर्चा होती. खासदार सदाशिव लोखंडे यांनी यांच्यावर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह ३२ गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशाने संपर्क कार्यालयाचा प्रारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ४ वाजता निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु सायंकाळी सात वाजेपर्यंत भाजपचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांसह मतदारांची गर्दीच न झाल्याने लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली.

त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे परस्पर नगर दक्षिणेत प्रचारासाठी निघुन गेले. तर कृषी मंत्री दादा भुसे हे श्रीरामपूर येथिल हेलिपॅडवर उतरून प्रमुख कार्यकर्त्यांची कानउघाडणी करून पुढील कार्यक्रमास निघून गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरला जाण्यापूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांना व आयोजकांना खासगीत चांगलेच झापल्याची चर्चा आहे. खासदार लोखंडे यांचा कार्यकर्ता मेळावा व कार्यक्रमाचे ठिकाण नवीन कार्यालयासमोर किंवा बाजारतळावर ठेवण्यात यावे, असे चर्चेतून पुढे आले.

हा कार्यक्रम एका संस्थेच्या आवारात ठेवल्यामुळे व स्थानिक राजकीय कलहातून अनेक कार्यकर्त्यांसह मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe