Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये आजवर लाखांच्या लीडने निवडून आलेत ‘हे’ पाच खासदार ! विखे आजोबा-नातवाचा जगावेगळा रेकॉर्ड

Ahmednagarlive24 office
Published:
balasaheb vikhe with sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचा इतिहासच काही और आहे. तसा विचार केला तर अनेक पैलू, अनेक वैशिष्ठ्यांचा इतिहास या निवडणुकांना आहे. असे पाच खासदार आहेत की ते जवळपास लाखांच्या लीडने निवडून आले आहेत. तर विखे पाटील घराण्यातील खा. सुजय विखे व त्यांचे आजोब बाळासाहेब विखे यांचा तर रेकॉर्डच वेगळा आहे.

सुजय विखे यांना २०१९ ला सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळवला होता, तर याच मतदारसंघात बाळासाहेब विखे यांचा अवघ्या ११ हजार ६३७ मतांनी यशवंतराव गडाख यांनी पराभव केला होता. हे आजवर सर्वांत कमी मताधिक्य राहिले आहे. म्हणजेच सर्वाधिक लीड घेणारे व सर्वात कमी मताने हरणारे असे दोघेही विखे घराण्यातील व्यक्तिमत्व आहेत.

सुजय विखे – ऐनवेळेस पक्ष बदलूनही सर्वात जास्त लीडने विजयी
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अशी लढत झाली होती. त्यावेळी सुजय विखे यांनी आधीपासूनच लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता.

परंतु, ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने त्यांची कोंडी झाली. शरद पवार यांनी काँग्रेसला जागा सोडण्यास नकार दिल्यानंतर सुजय विखे यांनी भाजपकडून तिकीट मिळवले होते. या लढतीत त्यांनी २ लाख ८१ हजार ४७४ मतांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला होता.

बाळासाहेब विखे – सर्वात कमी मताने पराभव
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपले वजन वापरून यशवंतराव गडाख यांना काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्यावेळी बाळासाहेब विखे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत यशवंतरावांनी बाळासाहेबांचा ११ हजार ६३७ मतांनी पराभव केला होता. हा पराभव जिव्हारी लागलेल्या विखेंनी थेट कोर्टात अपील केले.

गडाखांनी अवैध मार्गाचा अवलंब केला व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर सभांतून आपले चरित्र्यहनन केले असा आरोप केला. यानंतर औरंगाबाद खंडपीठाने विखेंच्या बाजूने निकाल दिला व गडाखांची खासदारकी रद्द करत सहा वर्षांची बंदी घातली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही हाच निकाल कायम ठेवला.

लाखांच्या लीडने निवडून आलेले खासदार
– नगर लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेस (आय) चे चंद्रभान आठरे विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे (यू) एकनाथ निंबाळकर यांचा १ लाख ८० हजार २१४ मतांनी पराभव झाला होता.
– १९८४ मध्ये काँग्रेसच्या यशवंतराव गडाखांनी जनता पार्टीच्या बबनराव ढाकणे यांचा १ लाख ३२३ मतांनी पराभव केला होता.

– १९८९ मध्ये भाजपच्या ना.स. फरांदे यांचा १,५३,७४५ मतांनी यशवंतराव गडाखांनी पराभव केला होता.
-२०१४ च्या लोकासभा निवडणुकीत दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादीच्या राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मतांनी पराभव केला होता
-२०१९ ला सुजय विखे यांनी २ लाख ८१ हजार ४७४ मतांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe