Ahmednagar Politics : आपल्याकडे एक म्हण आहे सख्खे शेजारी, पक्के वैरी..! आणि ही म्हण आठवण्याचे कारण म्हणजे अहमदनगरच्या राजकारणात नजरेस पडलेली एक राजकीय घटना. विशेष म्हणजे ही घटना छोटी असली तरी अनेक अर्थ काढून देणारी आहे त्यामुळे या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र रंगलीये.
त्याचे झालेय असे की, पाथर्डीत भाजपचे खा. सुजय विखे व वंचितच उमेदवार दिलीप खेडकर यांची कार्यालये शेजारी शेजारी आली आहेत. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मागील वर्षापासून खा. सुजय विखे यांचे संपर्क कार्यालय आहे.
त्यांच्याच शेजारी योगायोगाने प्रदूषण विभागाचे माजी आयुक्त दिलीप खेडकर यांनी वंजारी सूचक मेळाव्यानिमित्त संपर्क कार्यालय सुरू केले होते. विखे व खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात मध्ये फक्त प्लायवूडचे साधे पार्टिशन आहे.
लोकसभेला खा. विखे यांना भाजपची, तर खेडकर यांना ओबीसी व वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही उमेदवारांचे संपर्क कार्यालय शेजारी शेजारी असल्याने याबाबत खुमासदार चर्चा रंगलेल्या आहेत.
शेजारी-शेजारी पण ‘सख्खे शेजारी पक्के वैरी’ ..
आता या दोघांची शेजारी शेजारी कार्यालय आहेत हे जरी खरे असले तरी हा केवळ एक योगायोग. यात दोघांचाही कुठलाही राजकीय उद्देश नाही. परंतु योगायोगाने का होईना दोन पक्षांच्या उमेदवारांचे ऑफिस शेजारी-शेजारी आल्याने ‘सख्खे शेजारी पक्के वैरी’ (राजकीय दृष्ट्या) म्हणून मतदारांमध्ये हा कुतूहलाचा विषय झाला आहे. त्याची खुमासदार चर्चा रंगली आहे
दिलीप खेडकर यांचे बंधू होते भाजप तालुकाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांचे बंधू माणिकराव खेडकर यांनी सुमारे सहा वर्षे भाजप तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले. एक महिन्यापूर्वी त्यांची पदावरून गच्छंती करण्यात आली.