Ahmednagar Politics : विख की लंके? अखेर आ. राम शिंदेंनी सांगितलं कोण होणार विजयी, भल्याभल्यांचे अंदाज चुकणार, चर्चांना उधाण

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

 

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची निवडणूक राज्यात गाजली. सर्व जनतेसह अगदी सट्टाबाजाराचेही लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागल्याचे बोलले जात आहे. येत्या ४ जूनला मतमोजणीत निलेश लंके विजयी होणार की खा. सुजय विखे दुसऱ्यांदा खासदार होणार हे समजणार आहे.

दरम्यान आता कोण विजयी होईल याबाबत आ. राम शिंदे यांनी भाकीत केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काय म्हणाले आ.शिंदे
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक अफवा पसरवण्यात आल्या, तथाकथित सर्वेक्षणही करण्यात आले. परंतु काही असले तरी यावेळी पुन्हा विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील नक्कीच विजयी होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

पण मात्र गेल्या निवडणुकीइतके सुजय विखे यांना बहुमत मिळणार नाही. यावेळी ते जवळपास एक लाखाच्या फरकाने विजयी होतील असे भाकीत त्यांनी केले आहे. तसेच बोलताना पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदनगरमध्ये जी सभा झाली त्याचा फायदा त्यांना होईलच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केले ते प्रचारा दरम्यान लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झाले असल्याने त्याचे बेनिफिट विखेंना मिळतील व ते विजयी होतील.

मताधिक्य घटण्याचा अंदाजाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, जुन्या काळात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाबाबत नवीन मतदारांना जास्त माहिती नाही. एखादा पक्ष सातत्याने सत्तेत असेल तर त्यांनी त्यांच्या काळात केलेलं काम अनेकांना माहिती नसल्याने मताधिक्य घाटात असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला.

मताधिक्य घटेल
खा. सुजय विखे यांच्या विजयाचे भाकीत करताना ते म्हणाले, त्यांचा विजय होईल परंतु यावेळी मताधिक्य घटेल असा अंदाज व्यक्त केला. २०१९ मध्ये डॉ. विखे यांना सुमारे पावणे तीन लाखाचे मताधिक्य असले तरी यंदा मात्र ते कमी होउन एक लाखाच्या आसपास असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अँटि इनकंबसीचा फटका मताधिक्यावर होऊ शकतो असे ते म्हणालेत.