Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. अहमदनगर लोकसभेची लढत अत्यंत घासून झाली असल्याने याचे काय निकाल येतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. आज ४ जून ला सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
परंतु आता याबाबत एक महत्वाची बातमी आहे. अहमदनगर लोकसभेत कोण विजयी झाले? निलेश लंके की सुजय विखे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. साधारण रात्री ८ तरी हा निकाल यायला लागतील असे म्हटले जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की,
लोकसभेचा जो निकाल आहे तो राऊंड नुसार होणार आहे. फेऱ्या अनेक आहेत. नगर शहरासाठी कमीतकमी २१ राउंड आहेत. तर जास्तीत जास्त राउंड २७ आहेत. त्यामुळे जर एका फेरीला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास साधारण अर्धा तास पकडला तरी परिपूर्ण निकाल यायला साधारण ८ ते ९ तरी वाजतील असा अंदाज आहे.
ट्रेंड दुपारनंतर कळेल
दरम्यान प्रत्येक फेरीनंतर काय ट्रेंड आहे ते साधारण दुपारीपर्यंत कळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राउंडचा निकाल टीव्हीमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न असेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकंदरीतच अहमदनगरचा परिपूर्ण निकाल यायला साधारण रात्री ८ ते ९ तरी वाजतील असे म्हटले जात आहे.
दरम्यान सकाळी पोस्टलची फेरी झाली त्यावेळी त्यात सुजय विखे हे आघाडीवर होते. त्यामुळे आता जेव्हा ईव्हीएम मोजणी सुरु होईल तेव्हा मतदार संघवाईज कोण पुढे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.