Ahmednagar Politics : पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार असताना दूध, कांदा प्रश्नावर आवाज का नाही उठवला? खा.सुजय विखेंचा लंके यांच्या वर्मावर घाव

Ahmednagarlive24 office
Published:
sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदार संघात आता आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. आता खा. सुजय विखे यांनी विरोधकांकडून प्रचारात वापरल्या जाणाऱ्या कांदा भाव, दुधाचे दर आदी मुद्द्यांवरून घणाघात केला आहे. त्यांनी अगदी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांचेच पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केलाय.

कांदा प्रश्नावरून काय म्हणाले सुजय विखे ?
कांदा प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करता, अहो पावणे पाच वर्षापासून तुम्ही देखील सत्ताधारी आमदार होतातच की, काय केलं कांद्याच्या प्रश्नावर? का नाही लढले तुम्ही? का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देताय. कांद्याला भाव मिळाला नाही, म्हणून मी राजीनामा देतो,

असं जर तुम्ही म्हटलं असतं तर तुमचा आम्ही सत्कार केला असता. हा राजीनामा तुम्ही तीन वर्षा अगोदर का नाही दिला? दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला? हे फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी चित्र रंगवलं जातंय असा घणाघात त्यांनी केला.

सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय
दरम्यान यावेळी सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून समोरील उमेदवाराच्या धमकावण्याबाबतच्या प्रकरणाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, पन्नास वर्षे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये तुम्ही सत्ता देण्याचं काम केलं. या ५० वर्षांमध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं, राज्यमंत्री पद मिळालं, जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद मिळालं, खासदारकी मिळाली, पण आम्ही ५० वर्षांमध्ये कोणालाही धमकावलं नाही. याचा अभिमान आम्हाला आहे.

आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि जर हेच सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण मला १३ मे ला तीन नंबरचे बटण दाबून विजयी करा. विशेष म्हणजे तीन नंबरचे बटण पांडुरंगाने दिलं, कारण नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल म्हणून आपण तीन नंबरचे बटण दाबावे ही विनंती असेच नेते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe