विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी, पहा मतांची आकडेवारी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी, पहा मतांची आकडेवारीअहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व पारनेर मतदार संघाची मतमोजणी सुरु आहे. सर्वांच्याच नजरा कोण विजयी होणार याकडे लागलेल्या आहेत. शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व खा. सदाशिव लोखंडे यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान यात शिवसेना उभाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत.

तर दक्षिणेत सुजय विखे व निलेश लंके यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिर्डीत सध्या भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे सदाशिव लोखंडे हे पिछाडीवर आहेत. एक नजर टाकुयात शिर्डीतील उमेदवारांच्या आकडेवारीवर –

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 468359 (+ 45939)
लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना) – 422420 ( -45939)
उत्कर्ष प्रेमानंद रुपवते (वंचित बहुजन आघाडी) – 89948 ( -378411)

भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) 13756 ( -454603)
रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पक्ष) 6910 ( -461449)
रवींद्र कल्लय्या स्वामी (अपक्ष) 5444 ( -462915)

साधारण या आकडेवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भाऊसाहेब वाकचौरे 45939 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसते.

Ahmednagarlive24 Office