विधानसभा निवडणूक

Ahmednagar Politics : ५० वर्षांचे वर्चस्व तरी राहुरीत विखेंना का धक्का? तनपुरेंसह ‘त्या’ ‘घरभेदीं’चाही फटका, कर्डिलेंनी मात्र…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर दक्षिणेचा निकाल हा भाजपला व योगानेच विखेंनाही हादरवणारा आहे. भाजपची दक्षिणेत लोकसभेला जवळपास २० वर्षांपासून अहमदनगर दक्षिणेत विजयी घौडदौड दिसते. परंतु निलेश लंके यांनी याला छेद दिला.

तसेच विखे घराण्याचे जे वर्चस्व आहे त्यालाही हा छेद मानला जातोय. अनेक ठिकाणची जी आकडेवारी वाढली त्याचा फायदा लंके यांना झाल्याचे जाणकार मंडळीचे अंदाज आहेत. यातच राहुरीचाही समावेश होऊ शकेल. राहुरीमधील जवळपास ६४ गावे नगर दक्षिण मतदार संघाला जोडलेली आहेत.

येथे जो मतदानाचा टक्का वाढला तो लंके यांच्या फायद्याचा ठरला असे जाणकार मंडळीचे अंदाज आहेत. तीन ते सात फेऱ्यापर्यंत मिळालेली मताची आघाडी पाहता विखे विजयी होतील, असे अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात होते. मात्र कर्जत, जामखेड, श्रीगोंदे भागात लंके यांचे मताधिक्य वाढत गेल्याने विखेंचे मताधिक्य घटत गेले.

कर्जत-जामखेडमध्ये लंके आघाडीवर राहतील, हे मतदानानंतर व्यक्त करण्यात आलेले अंदाज निकालानंतर तंतोतंत खरे ठरले. राहुरीमध्ये विखे यांचे वर्चस्व असूनही विरोधात देखील तोडीसतोड मतदान का झाले? याचीही चर्चा सध्या रंगली आहे.

काहींचा घरभेदीपणा ठरला पराभवास जबाबदार
निवडणूक प्रचार यंत्रणेत असलेल्या काही मंडळीचा घरभेदीपणा विखेंना मिळणाऱ्या मतदानाची पिछेहाट करणारा ठरला. दरम्यानच्या काळात उंबरे, ब्राम्हणी तसेच गुहा प्रकरणात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समवेत डॉ. सुजय विखे यांनी विषिष्ट गटाची घेतलेली बाजू देखील विखेंच्या मताधिक्य घटण्यास कारणीभूत ठरले असल्याची चर्चा आहे.

गटात पडलेली फूट..
राहुरीत विखे यांना मानणारा मोठा गट असला तरी यंदाच्या निवडणुकीत या गटात पडलेली फूट विखेंचे मताधिक्य घटण्यास कारणीभूत ठरली. विखेंची राहुरीत कोंडाळे करून असलेल्या ठराविक यंत्रणेचा आत्मविश्वास निवडणुकीत नडला असल्याची चर्चा देखील काही लोक करत आहेत.

कर्डिलेंनी मात्र प्रामाणिक काम केले
माजी आ. शिवाजीराव कर्डीले हे कुणाचे काम करतील अशी चर्चा होती. परंतु त्यांनी मात्र प्रामाणिकपणे भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचे काम केले असल्याची चर्चा सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office