Ahmednagar Politics : सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर काही ठिकाणी मतदान होणे बाकी आहे. अद्याप तीन टप्पे मतदानाचे बाकी आहेत. यात सध्या एक विषय चर्चेचा झाला आहे तो म्हणजे, घटलेली मतदानाची आकडेवारी.
प्रबोधन करूनही मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत नाहीये. परंतु आता या सर्वांसमोर आदर्श निर्माण केलाय अहमदनगरमधील एका घटनेने, एका महिलेने. मागील तीन वर्षांपासून प्रसूतीच्या वेळेला कोमात सदर महिला होती.
अधिक माहिती अशी : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एका गावातील ही महिला आहे. ही महिला मागील तीन वर्षांपासून प्रसूतीच्या वेळेला कोमात गेली होती. आता त्या कोमातून बऱ्या झाल्या आहेत.
त्यांनी काल झालेल्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेतं मतदानाचा हक्क बजावला आहे. व्हीलचेअरवर बसून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. घरची परिस्थिती बिकट असताना त्यांच्या पतीने त्यांची लहान मुलासारखी काळजी घेतली होती.
औषध उपचार करून वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये नेले आहे. यामुळे मागील वर्षांपासून त्यांच्यात थोडी सुधारणा झाली होती. विविध आर्थिक संकटांचा सामना करत व परिस्थितीशी झुंज देत त्यांची प्रकृती सुधारत होती.
आता सुधारणा होताच मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदान करायचे ठरवले, व्हीलचेअरवर बसून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
आदर्श
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदान झाले. त्यामुळे परंतु यावेळी मतदानाची टक्केवारी घसरलेली पाहायला मिळाली. अनेक पद्धतीने प्रबोधन करूनही, अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करूनही ही टक्केवारी वाढली नही. अशा मतदान न करणाऱ्या मतदारांसाठी ही घटना म्हणजे एक आदर्शच आहे अशी चर्चा सध्या होत आहे.