अहमदनगर, शिर्डीची ४ जूनला ‘कशा’ पद्धतीने व किती वाजता होणार मतमोजणी ? ठिकाण कुठे? कसे आहे मतमोजणीची नियोजन? जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
vote counting

Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल येत्या ४ जूनला लागणार असून या होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची ही मतमोजणी नगर एमआयडीसीमधील असणाऱ्या वखार महामंडळाच्या दोन गोदामात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळी आठ वाजताच मोजणी सुरु होईल. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून यासाठी तब्बल ७६८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. ४ जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे.

असे एकूण १९२ टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल असून याचेही विभाजन दोन टप्प्यांत केले असून पोस्टल मतांसाठी दोन टेबल, तर ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल अशी पद्धत असणार आहे.

टेबलनुसार कर्मचारी असतील यात साधारणपणे एका टेबलवर ४ कर्मचारी असतील. यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी तेथे असतील. या आठवडाभरात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर शिर्डीत २० उमेदवारांमध्ये लढत होती. दोन्ही मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून यात नगरमध्ये ६६.६१ टक्के म्हणजे १३ लाख २० हजार १६८ मतदान झाले, तर शिर्डीसाठी ६३.०३ टक्के म्हणजे १० लाख ५७ हजार २९८ मतदान झाले.

एका टेबलवर चार कर्मचारी
४ जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. असे एकूण १९२ टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल असून

याचेही विभाजन दोन टप्प्यांत केले असून पोस्टल मतांसाठी दोन टेबल, तर ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल अशी पद्धत असणार आहे. टेबलनुसार कर्मचारी असतील यात साधारणपणे एका टेबलवर ४ कर्मचारी असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe