विधानसभा निवडणूक

अजित पवार यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले, शरद पवार गटाची धास्ती की ‘दादा’ परतीच्या वाटेवर? पहाच..

Published by
Ahmednagarlive24 Office

निवडणूक संपल्याने सर्वांनाच निश्वास सोडला असला तरीही अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही. अजित पवार गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीचा आखाडा संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे. दरम्यान ही खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी काही कारणे आहेत याच्या चर्चा मात्र सुरु आहेत.

नेमके काय घडतेय?
आधी आपण नेमके काय घडतेय ते पाहुयात त्यानंतर त्याची कारणे पाहुयात. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट जोमाने सक्रिय झाला असून येत्या २७ तारखेला सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आलीये.

या बैठकीत लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा केली जाणार असून मित्र पक्षांनी दिलेले सहकार्य त्यांनी केलेलं मतदान त्यांच्यामुळे झालेला फायदा आदींची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून प्रयत्न?
आता मुंबईमधील या बैठकीला सर्वच आमदार बोलावले असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. काही नागरिक असे म्हणतायेत की, निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल. जर खरोखर असे असेल तर अजित पवार गटाच्या आमदारांच्या खरोखर चलबिचल आहे का असाही सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे.

पुढील रणनीती महत्वाची..
अजितदादा गटाच्या या बैठकीस वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील. स्वतः अजित पवार या बैठकीला संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो रिझल्ट येईल त्यानंतर काय रणनीती आखायची तसेच शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती साधारण कशा पद्धतीची निर्माण होईल याबाबत चर्चा, रणनीती या बैठकीत केली जाईल अशी सध्या चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office