विधानसभा निवडणूक

‘अरे निलेश बेट्या तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. माझ्या नादाला लागू नको…’ अजित पवारांची दादा स्टाईल फटकेबाजी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 13 मे 2024 ला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होणार आहे. दरम्यान अहमदनगर मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या नेत्यांचा फौज फाटा अहमदनगर मध्ये अवतरला आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. या सभेत अजितदादांनी दादा स्टाईल फटकेबाजी केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार टिका केली आहे. दरम्यान आता आपण अजितदादा यांनी आपल्या भाषणात नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेणार आहोत.

काय म्हटलेत अजित दादा?
निवडणुकीत आपले तरुण सहकारी उभे आहेत, दुसऱ्यांदा जनतेकडे कौल मागत आहेत, दिल्लीत लोकांचे प्रश्न त्यांच्या मार्फत मांडले जावेत, म्हणून सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आलो असल्याचे म्हटले आहे. सुजय अतिशय हुशार आहे त्याला कामाची जाण आहे त्याने लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडले आहेत.

डॉक्टर सुजय विखे हे दुसऱ्यांदा लोकसभेत जात आहेत आणि त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. लोक कल्याणाचा विचार करणाऱ्यां पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 13 मे ला सुजय विखे यांना मत देऊन त्यांना विजयी करा, असे आवाहन अजित दादांनी केले आहे. हे सरकार गोरगरिबांचे आहे, सर्वसामान्यांचा विकास हेच महायुतीचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून कांदा निर्यात बंदी हटवली आहे, त्यामुळे आता कांद्याचा भाव वाढू लागला आहे.

महायुती सरकार दूध अनुदानाचे पैसे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे कुणाचाही एक रुपया बुडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी दिली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या निधीची गरज असते. यामुळे केंद्राच्या विचाराचा खासदार असला पाहिजे. म्हणून सुजय विखे पाटील यांना निवडून द्या असे अजित दादा यांनी आपल्या भाषणात म्हटले.

कर्जत तालुक्यातील एसटी डेपोची फाईल मीच मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो आणि सही घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे अजित दादांनी यावेळी सांगितले.
आम्ही रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला, पण त्याची ऑर्डर निघण्याच्या अगोदर माजी आमदार आम्ही केलं आम्ही केलं असं सोशल मीडियावर सांगत फिरतात. मी निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता, अशी टिका अजित दादांनी केली आहे.

काहींना एवढी घाई झाली आहे की, पहिल्या टर्ममध्ये राज्याचा नेता व्हायच आहे. लोकांनी नादवला आणि तो पट्ठ्या स्वतःच लोकसभेला उभा राहिला, आधी आमदार हो, पाच दहा वर्षे काम कर, तिथली माहिती घे, त्याला इतकी घाई की एकदम केंद्राची स्वप्ने पाहणे बरे नाही, असा टोला अजितदादांनी निलेश लंके यांना लगावला आहे. पारनेरचे 100-200 तरुण पोरं माझ्याकडे आली आणि बोलले की आम्ही दिवस-रात्र मेहनत घेऊन निलेश ला आमदार केले मात्र तो आम्हाला विसरला आहे.

येथील स्थानिक आमदार हे सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात दमदाटी करतात मात्र आता हे खपवून घेतले जाणार नाही. एमआयडीसी मध्ये स्थानिक लोकांना डावलून बाहेरील लोकांचा भरणा करतात, हप्तेखोरी करतात. अरे कुठे फिरणार हे पाप… असं म्हणतं अजितदादांनी नाव न घेता निलेश लंके यांच्या वर घणाघात केला आहे.

यावेळी अजितदादांनी जर कोणी दबावाखाली असेल तर सांगा अजित पवार आले होते, आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की, घाबरू नका महायुती सरकार आपल्या सोबत आहे. गोरगरीब लोकांच्या केसाला धक्का लागला तरी सोडणार नाही, असा इशारा अजितदादांनी यावेळी दिला आहे.

अजित दादांनी अरे निलेश बेट्या तु ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. माझ्या नादाला लागू नको. असे म्हणतं लंके यांना निर्वानीचा इशारा दिलाय.
तसेच यावेळी त्यांनी भाषणात गडी पुरता वाया गेला आहे. येत्या चार तारखेला जेव्हा मतपेढ्या उघडतील तेव्हा हे लंकेचे पार्सल घरी पाठवा असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24