विजय शिवतारे यांनी माघार घेऊ नये म्हणून कोणी-कोणी फोन केलेत हे मला समजलय, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Tejas B Shelar
Published:
Ajit Pawar On Sharad Pawar

Ajit Pawar On Sharad Pawar : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.

आता राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. दरम्यान, एकेकाळी सोबतीने काम करणाऱ्या या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आता राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही गटांच्या नेत्यांच्या भूमिकेत आता मोठा बदल झाला आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे स्वतः देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशातच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजितदादा यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यात बोलतांना त्यांनी तुफान फटकेबाजी केली अन शरद पवार यांना अनेक टोले लगावलेत. महायुतीच्या उमेदवार निवडीवर बोलताना अजित दादांनी परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले.

तसेच विजय शिवतारे यांच्याबाबतही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी परभणीमधून राजेश विटेकर हे निवडून येण्याची क्षमता असतानाही आम्ही महादेव जानकर यांना ही जागा दिली असे म्हटले.

तसेच याच जानकारांवर शरद पवारांनी गळ टाकला होता पण मासा अडकण्याच्या आत आम्ही मासा काढून घेतला असं म्हणत ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असे म्हटले. म्हणजे शरद पवार यांचा डाव त्यांच्यावर उलटवला असं अजित दादा यांनी अप्रत्यक्षरीत्या सांगितले.

पुढे बोलताना अजित दादांनी त्यांच्यातलेच जीन्स माझ्यात आहेत. अहो चार दिवस सासूचे अन चार दिवस सुनेचे, आजचे दिवस सुनेचे आहेत. त्यामुळे सासऱ्याने अन सासूने आता घरात बसायला हवं.

आता जर एवढे समजावून देखील वेगळं काही झालं तर तो मी शब्द वापरत नाही, नाही तर त्याची हेडलाईन होईल, असं म्हणत हा विषय थांबवला. यावेळी त्यांनी तब्बल 90 मिनिटांपर्यंत भाषण दिले. या भाषणात त्यांनी जास्त वेळ पवार यांच्याबाबतच अप्रत्यक्षरीत्या भाष्य केले.

शिवतारेंबाबत मोठा गौप्यस्फोट 

अजितदादांनी विजय शिवतारे यांच्याबाबतही मोठे विधान केले आहे. अजितदादा यांनी ‘शिवतारे यांनी मला त्यांना आलेले फोन दाखवले. ते कॉल मी शिंदे अन फडणवीस यांनाही दाखवलेत. शिवतारे यांनी माघार घेऊ नये याकरता कोणी-कोणी फोन केले हे सगळे आम्हाला समजले आहे.

अहो इतक्या खालच्या पातळीवर जातात. मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही’, असं म्हणत शरद पवार यांच्यासह संपूर्ण गटाला इशारा दिला असल्याचे पाहायला मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe