लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली होती. आता जवळपास दीड तास उलटून गेला असून साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत जी आकडेवारी आली होती त्यानुसार इंडिया आघाडीचा चमत्कार दिसायला सुरवात झाली आहे.
भाजपसाठी उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी मोठा धक्का बसताना सध्या दिसून येत आहे. सकाळी जेव्हा पहिल्या फेरीतील कल हाती आला त्यावेळी भाजप आघाडीवर दिसून येत होते.
जवळपास 300 च्यावर जागांवर भाजपने आघाडी घेतली असे वाटत होते. परंतु आता दीड तासानंतर मोठा ट्विस्ट आला असून भाजपची घसरण होतानाचे सध्याचे चित्र आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप 290 जागांवर आघाडीवर असून इंडिया आघाडी 210 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला भाजपने 311 जागांवर आघाडी तर काँग्रेसने 141 जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र होते. ज्या पद्धतीने कल येत आहेत त्याहिशोबाने पहिले तर मोदींची लाट ओसरली आहे का अशी चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला धक्का ?
उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसेल का असे चित्र सध्या दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात भाजप 32 जागांवर तर समाजवादी पार्टी 37 जागांवर पुढे असल्याचे साध्यासह चित्र आहे. उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा सर्वांचा अंदाज सर्वानीच बांधला असताना आता मात्र हा अंदाज फोल ठरेल का अशीही चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रातही महविकास आघाडीचाच बोलबाला
महाराष्ट्रातही भाजपला धक्का बसेल असे चित्र आहे. सध्याच्या कलानुसार महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 19 जागा तर महाविकास आघाडीला 27 जागांची आघाडी मिळताना दिसतेय.