विधानसभा निवडणूक

भाजप 250 जागांवर अडकेल ! महाराष्ट्रात महायुती व मविआला प्रत्येकी 24 जागा मिळतील.. पहा राजकीय विश्लेषक काय म्हणतात..

Published by
Ahmednagarlive24 Office

देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप एकीकडे ‘अब की बार 400 पार’चा नारा देत प्रचाराला लागले होते तर दुसरकीकडे विरोधकांनीही भाजपाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान आता राज्यात तसेच देशात कसे चित्र राहील याचा अंदाज बांधला जात आहे.

त्यात यंदा महाराष्ट्राकडे सर्वांचे लक्ष लागले कारण महाराष्ट्रातील निर्णय काय येतो यावर भाजपची सत्तेतील सूत्रे अवलंबून असतील. दरम्यान आता लोकसभेचा निकाल 2014 सारखा लागू शकतो, असे मत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी व्यक्त केले आहे.

निवडणुकीचा कल महाविकास आघाडीकडे झुकत असल्याचे दिसते असेही ते म्हणालेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘लोकसभा निवडणुकीची दिशा आणि महाराष्ट्राचा राजकीय कल ‘या विषयावर बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेय.

मविआ – महायुती 24 – 24 जागा घेतील?
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी प्रत्येकी 24 – 24 जागा घेऊ शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्र हा केंद्र सरकारमध्ये कोणाला सत्तेत आणायचे आणि कुणाला नाही याविषयी निर्णायक भूमिका घेऊ शकेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रादेशिक पक्षांना वाढते पाठबळ
प्रकाश पवार यांनी मनोगतात असे म्हटले की, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ती 2009 किंवा 2014 प्रमाणे सुरु असून ती 2019 सारखी एकहाती होईल असे वाटत नाही. देशभर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य आहे व त्यांच्या भोवती निवडणुकीचे मुद्दे फिरत असल्याचे ते म्हणाले.

परंतु दुसरीकडे स्थानिक प्रादेशिक पक्ष प्रभावी झाले असून त्यांच्या नेतृत्वाला जनतेतून पाठबळ मिळताना दिसत असल्याचेही जाणकार सांगतात. नेते दुसऱ्या पक्षात गेले तरी मते जात नसतात असेही जाणकार सांगतात.

भाजपची मतांची टक्केवारी 38 वरून 20 टक्क्यांवर आली ?
प्रादेशिक पक्ष स्वतःचा प्रभाव निर्माण करत असताना दिसतायेत. दरम्यान भाजप आणि संघ यांची मतदानाची मागील वेळी 38 टक्के असणारी टक्केवारी 20 टक्क्यांवर आली असल्याचे जाणवते.

Ahmednagarlive24 Office