छगन भुजबळ थांबले ! अचानक नाशिकमधून माघार, पण का? हे आहे महत्वपूर्ण कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवदरून धुसफूस सुरू होती. येथे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणुकीसाठी आग्रही होते.

आपल्याला शहा-मोदी यांनीच लढण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले होते. परंतु आज अचानक त्यांनी आपण नाशिक मधून थांबत आहोत असे सांगत उमेदवारीवरील हक्क सोडला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला निर्णय या ठिकाणी सांगून टाकला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले, परंतु यावेळी त्यांनी यामागचे कारणही सांगून टाकले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी माझ्या नावाचा आग्रह धरला त्याबद्दल आभार मानतो असेही ते म्हणाले.

भुजबळ यांनी यावेळी म्हटले की, नाशिकच्या जागेवर माझा दावा नव्हता. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत मोदी, शहा यांनी माझ्या नावाचा आग्रह धरला होत असे सांगत त्यानंतर बराच काळ त्याला झालाय असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेचे खसदार असल्याने त्यामुळे ही चर्चा बराच काळ लांबली.

या दरम्यान येथे महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला. महायुतीचा उमेदवार ठरविण्यात जेवढा उशीर होईल, तेवढाच फटका आम्हाला बसू शकतो. याच कारणास्तव मी नाशिकमधून माघार घेत आहे असे भुजबळांनी सांगितले.

नाशिकच्या जागेबाबत पक्षनेतृत्वाकडून मला सांगून तीन आठवडे झाले आहेत. या ठिकाणची तिढा अजूनही सुटलेली नाही. दुसरीकडे समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बराच काळ लोटला असून त्यांनीही जोमाने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीला नाशिकच्या जागेत अडचणी येऊ शकतात. हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार यांनी देवगिरीवर मला सांगितले की, मी, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलो होतो, नाशिकमध्ये आमच्या पक्षाचे आमदार जास्त असल्याने आम्ही नाशिक लोकसभेची जागा मागितली.

या ठिकाणी आम्ही आमच्याकडून समीर भुजबळ यांचे नाव सुचवले होते. तिथे आपला उमेदवार छगन भुजबळ असावेत असे अमित शहा म्हणाले. तुम्हाला तेथून लढावे लागेल. अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे मी नाशिकमध्ये तयारीला लागलो होतो.शिवसेनेनंही तिथं दावा केला. महायुतीचे या वादात नुकसान होऊ नये म्हणून मी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी केली.