विधानसभा निवडणूक

लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? NDA पुन्हा सत्तेवर येणार की INDIA उलटफेर करणार? Exit Poll ची आकडेवारी काय सांगते

Published by
Tejas B Shelar

Exit Poll 2024 : आज लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जून 2024 ला जाहीर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत कुणाला बहुमत मिळेल? कुणाची सत्ता येईल? कोण सत्तेबाहेर राहील? हे स्पष्ट होणार आहे. 4 जूनला दुपारी दोन वाजेपर्यंत हे सारे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने साऱ्यांचे लक्ष एक्झिट पोल कडे लागले आहे. आम्ही आपणास सांगू शकतो की, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी एक्झिट पोल हे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणूकित निकाला आधीच जाहीर होणार आहेत.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीचं चित्र काय असेल याचा साधारण अंदाज यातून सर्वसामान्य जनतेला बांधता येणे शक्य होणार आहे. खरेतर निवडणूक झाल्यानंतर लगेचच सर्वसामान्यांची एक्झिट पोलची सर्वजण वाट पाहत असतात. दरम्यान आता आपण यंदाचे विविध एक्झिट पोल आपण समजून घेणार आहोत.

विविध एक्झिट पोलची महाराष्ट्रातील आकडेवारी 

1)टीव्ही ९ मराठी

महायुती – 22

महाविकास आघाडी – 25

इतर – 1

2)एबीपी सी व्होटर

महायुती – 24

महाविकास आघाडी -23

इतर – 1

3) न्यूज 24 चाणक्य

महायुती-33

महाविकास आघाडी-15

इतर – 00

4)पोल ऑफ पोल

महायुती 22

महाविकास आघाडी 25

इतर – 1 

विविध एक्झिट पोलची संपूर्ण देशातील आकडेवारी  

1)रिपब्लिक टीव्ही + MATRIZE

एनडीए आघाडी – ३५३-३६८

इंडिया आघाडी – ११८ – १३३

इतर – ४३-४८

2)एनडीटीव्ही इंडिया 

एनडीए आघाडी – ३६५

इंडिया आघाडी – १४२

इतर – ३६

3)जन की बात

एनडीए आघाडी – ३६२ – ३९२

इंडिया आघाडी – १४१ – १६१

इतर – १०-२०

4)इंडिया न्यूज डी + डायनामिक्स

एनडीए आघाडी – ३७१

इंडिया आघाडी – १२५

इतर – ४७

5)रिपब्लिक टीव्ही + PMARQ MATRIZE

एनडीए आघाडी – ३५९

इंडिया आघाडी –  १५४

इतर – ३०

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com