विधानसभा निवडणूक

Maharashtra Politics : फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे, भाजपचे २५ आमदार फोडायचे.. एकनाथ शिंदेंनी आज सांगून टाकला प्लॅनिंग

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. पक्ष फुटल्यानतंर लोकसभेची ही पहिलीच निवडणूक असून अनेक गौप्यस्फोट सध्या या निमित्ताने होत आहेत. आता मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या गौप्यस्फोटाने राजकी चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी राजकीय गौप्यस्फोट करताना सांगितले की, भाजपच्या चार-पाच लोकांना जेलमध्ये डांबण्याचा उद्धव ठाकरे यांची योजना झाली होती. यामध्ये त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांचाही समावेश होता.

देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांबाबत माझ्याकडे माहिती आली असून आता देवेंद्रना सोडणार नाही. त्यांना तुरुंगातच टाकतो असे ठाकरे म्हटले असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

आज सोमवारी (दि.६ मे ) ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. याबाबत पुढे बोलताना शिंदे म्हणाले, फडणिसांना जेल मध्ये टाऊन गिरीश महाजनांवर देखील मोक्का लावायचा, भाजपला घाबरवायचे व त्यांचे २५ आमदार फोडायचे असा डाव होता असे ते म्हणाले.

मला समजताच असं करणे योग्य नाही असे मी त्यांना सांगून टाकले होते. तर यावर त्यांनी मला तसे करायचे आहे, असून भाजपला घाबरवायचे आहे. त्यांच्या लोकांना जेलमध्ये टाकून भाजपचे २० ते २५ आमदार फोडायचे असा त्यांचा पूर्णपणे प्लॅन होता असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

चर्चांना उधाण
दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्या गौप्यस्फोटानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काहींनी यावर महाविकास आघाडीचा चेहरा समोर आला असे म्हटले तर काहींनी एकनाथ शिंदे हे पक्षफोडीचे स्वतःचे पाप झाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टिपण्णी केली.

Ahmednagarlive24 Office