प्रथमच पंतप्रधान मोदी व राज ठाकरेंची एकत्रित भव्य सभा होणार ! कधी, कोठे, नेमके काय प्लॅनिंग? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनसेने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता थेट भाजपला अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत घोषणा करताच मनसैनिक महायुतीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान आता मुंबईत राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाचा लोकसभा प्रचार सुरु झाल्यापासून एकत्रित सभा ही पहिलीच सभा असेल. शिवाजी पार्क येथे ही भव्य सभा होणार असून मनसे नेत्यांकडून याबाबत अधिक माहिती समजली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितले की, आम्ही काही मतदारसंघांचा आढावा घेतला असून या ठिकाणी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यापासून मनसैनिक प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचारात उतरले असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, भिवंडी आदी ठिकाणच्या आढाव्यात कार्यकर्ते उत्साहात कामाला लागल्याचे दिसत आहे असे ते म्हणाले. शिवाजी पार्क मैदानासाठी आम्ही प्रथम अर्ज केला असल्याने परवानगी आम्हालाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

कधी होईल सभा?
येत्या १७ मे रोजी पंतप्रधान मोदी व राज ठाकरे यांची जाहीर सभा शिवाजी पार्क येथे होईल अशी माहिती त्यांनी दिली. या सभेच्या तयारीसाठी एक बैठक घेण्यात आली आहे. आम्ही नेहमीच राज ठाकरेंची सभा घेतो. त्यामुळे आम्ही नेहमीच त्याची तयारी करतो.

तरीही कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. ते म्हणाले, काही समस्या जाणून घ्याव्या लागतील. इतर आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. या सर्व बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नांदगावकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईत सर्व उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत.

प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व टिकणे ही काळाची गरज
शरद पवार यांनी पक्ष विलीन करण्यासंदर्भात केलेल्या विधानावर बाळा नांदगावकर बोलताना म्हणाले की, प्रादेशिक पक्षांची गरज प्रत्येक राज्यासाठी महत्त्वाची आहे. प्रादेशिक पक्षांना त्या राज्याची अस्मिता, त्या राज्याची संस्कृती, त्या राज्याचे प्रश्न यांची जाणीव असल्याने ते मांडण्याचे काम प्रादेशिक पक्ष करीत असतात. प्रादेशिक पक्षाचे अस्तित्व टिकणे ही काळाची गरज असल्याचे बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.