विधानसभा निवडणूक

अहिल्यानगर जिल्ह्यातून 1951 ते 2019 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये किती अपक्ष उमेदवारांनी मिळवला आहे विजय? जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा असून विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 विधानसभा मतदारसंघ येतात.

अहिल्यानगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे बहुतांश राजकारणी हे साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत. अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विखे कुटुंबियांनी खूप उल्लेखनीय असे काम केलेले आहे.महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या हा जिल्हा खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर आपण 1951 ते 2019 हा कालावधी बघितला तर या कालावधीत जवळपास 15 विधानसभा निवडणुका झाल्या असून यामध्ये प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय समीकरण दिसून आलेले आहे.

या कालावधीत जर आपण झालेल्या 15 विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातून वीस अपक्ष उमेदवार विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत.

त्यामध्ये 1957 यावर्षी सर्वात जास्त म्हणजेच आठ अपक्ष विधानसभेत पोहोचले होते तर त्या खालोखाल 1972 मध्ये चार अपक्ष उमेदवार विधानसभेपर्यंत पोहोचले होते. आतापर्यंत शिवाजी कर्डिले आणि प्रभाकर भापकर या दोन्ही नेत्यांनी दोनदा अपक्ष निवडून येण्याचा मान मिळवला आहे.

1951 ते 2019 पर्यंत अपक्ष उमेदवारांची राजकीय कामगिरी

1951 ते 2019 पर्यंत झालेल्या 15 विधानसभा निवडणुकांमध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातून वीस अपक्ष उमेदवार विजयी होऊन विधानसभेपर्यंत पोहोचले व यामध्ये शिवाजी कर्डिले आणि प्रभाकर भापकर हे दोनदा अपक्ष निवडून विधानसभेवर पोहोचले. 1951 मध्ये झालेली पहिली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अहिल्यानगर जिल्ह्यात तेव्हा असलेल्या नऊ जागांपैकी पूर्ण जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

परंतु त्यानंतर झालेल्या म्हणजेच 1957 मधील विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची मोठी पडझड झाली होती व तेव्हा अहमदनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे त्र्यंबक शिवराम भारदे हे एकच उमेदवार विजयी झाले होते व बाकीच्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती.

1962 यावर्षी झालेल्या निवडणुकीत 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे दहा उमेदवार निवडून आले होते व कम्युनिस्ट पार्टीचा एक व अपक्ष एक अशा उमेदवारांनी विजयश्री खेचली होती. 1962 च्या निवडणुकीसारखी परिस्थिती 1967 यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत होती.

परंतु 1972 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे सहा तर चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली होती. 1978 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आठ उमेदवार निवडून आले होते तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला होता.

1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आयचे नऊ तर कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेस(यु) चे प्रत्येकी एक तर जनता पक्षाचे दोन आमदार विजयी झाले होते. 1985 मध्ये  झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते तर 1990 मध्ये एक अपक्ष आमदार निवडून आला होता.

1995 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता तर 1999 मध्ये  देखील एका अपक्ष आमदार विजयी झाला होता. 2004 मध्ये देखील एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती तर 2009 मध्ये एकही अपक्ष उमेदवाराला विजय मिळवता आला न होता. त्यासोबतच 2014 ते 2019 या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील कुठल्याही अपक्षाला बाजी मारता आली नाही.

 अहिल्या नगर जिल्ह्यातून आतापर्यंत निवडून आलेले अपक्ष आमदार

1- वर्ष 1957- श्रीगोंदा मतदार संघातून नवशेरवान सतथा, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून नारायण आव्हाड, शेवगाव मतदार संघातून एकनाथ भागवत, नगर दक्षिण मधून प्रभाकर भापकर, पारनेर विधानसभा मतदारसंघातून भास्कर औटी,

राहुरी विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण पाटील, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भास्कर गलांडे, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नारायण नवले हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

2- वर्ष 1962- यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नगर उत्तर मधून प्रभाकर भापकर अपक्ष म्हणून विजयी झाले होते.

3- वर्ष 1967- शिर्डी विधानसभा मतदारसंघातून एम.ए.गाडे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

4- वर्ष 1972- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून बाबुराव बारस्कर, नगर दक्षिण मधून नवनीत बार्शीकर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून गणपत म्हस्के  तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून शंकरराव कोल्हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

5- वर्ष 1978- यावर्षी नगर उत्तर मधून मारुती शेळके अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.

6- वर्ष 1985- यावर्षी राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्रसाद तनपुरे आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

7- वर्ष 1990- यावर्षी शेवगाव विधानसभा मतदारसंघांमधून तुकाराम गडाख अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

8- वर्ष 1995- नगर उत्तर मधून शिवाजी कर्डिले अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते.

9- वर्ष 1999- नगर उत्तर मधून दुसऱ्यांदा शिवाजी कर्डिले हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.

10- वर्ष 2004- यावर्षी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमधून बबनराव पाचपुते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.

Ajay Patil