सत्तेसाठी वाट्टेल ते ! आयारामांना तिकीट, निष्ठावंतांची कोंडी, ४८ पैकी तब्बल ‘इतके’ उमेदवार ऐनवेळचे आयाराम

Ahmednagarlive24 office
Published:
nete

महाराष्ट्राचे लोकसभेचे वातावरण अतिशय विचित्र झालेले दिसते. काही झाले तरी जिंकायचेच असेच ध्येय जणू डोळ्यासमोर ठेऊन अनेक पक्षातून उमेदवार आपल्या पक्षात घेण्यात आले. व या आयारामांनाच ऐनवेळी निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. यात निष्ठावंतांची मात्र मोठी कोंडी झाली.

महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल २० जागेंवर उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले निश्चित करण्यात आले आहेत. यात कोणत्या जागा व कोणते उमेदवार आहेत यावर एक नजर टाकुयात –

रावेर
रावेरचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. परंतु येथे भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून तिकिटासाठी प्रयत्नशील झाले. या ठिकाणी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील इच्छुक होते पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने व इतर कारणाने येथे शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना तिकीट दिले.

धाराशिव
धाराशिवमध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर लढणार आहेत. लोकसभेसाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मिळालेली असल्यानं त्यांनी राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्याचे ठरवले असल्याने हे एका अर्थाने येथेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने उमेदवार आयातच केला असल्याचे समजले जाते.

जळगाव व माढा
जळगावमध्ये भाजपकडून स्मिता वाघ या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ज्या करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली ते उमेदवारी मिळण्यापूर्वी भाजपमध्ये होते. माढा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश बारस्कर हे मार्चपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते.

बीड, शिर्डी
बीडमधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी अजित पवार गटामध्ये असणारे बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात जात लोकसभेचे तिकीट घेतले. शिर्डीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे हे काँग्रेसमधील नेते होते.

इतर अनेक ठिकाणी प्रयोग
मावळ , मुंबई उत्तर पूर्व, नांदेड, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, शिरूर, अमरावती, वर्धा, रामटेक आदी ठिकाणी देखील आयाराम उमेदवारांनाच संधी दिलेली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe