.. खेळ ना कुणाला हा ‘दैव’ताचा कळला ! अजित दादांचे आमदार शरद पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारात, आधी छगन भुजबळ आता नरहरी झिरवाळ?..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या लोकसभेचे वारे जोरदार वाहत असून प्रचार अगदी जोरकस पणे सुरु आहे. सर्वच पक्ष अगदी कंबर कसून काम करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले व त्यानंतर होणारी ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे.

सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपसोबत सत्तेत आहे. लोकसभेलाही महायुतीचा घटक आहे. परंतु अजित पवार असतील किंवा अजित पवार गटाची आमदार असतील हे अद्यापही शरद पवार यांचीच माणसे आहेत असा एक सूर सध्या पाहायला मिळत आहे.

मध्यंतरी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट आहे असे म्हणणे असो की मग शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ हे तुतारीच्या प्रचार करतात असा आरोप करणे असो हे नेमके कुठे अंगुलिदर्शन करतात असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

आता या चर्चांना अधिक ऊत यायचे कारण म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे असलेले भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ बोलावलेल्या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची उपस्थिती.

महाविकास आघाडीच्या बैठकीत नरहरी झिरवाळ
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे डॉ. भारती पवार हे उमेदवार असून त्यांच्या विरोधात शरद पवारांचे भास्कर भगरे हे उमेदवार आहेत. तेथे महाविकास आघाडीने प्रचारासाठी चांगली कंबर कसली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज (दि. १० मे) महाविकास आघाडीच्या आयोजित बैठकीत नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते. त्या संबंधी एक फोटो व्हायरल झाला अन चर्चांना ऊत आला. ते थे नेमके का उपस्थित राहिले? याबाबत अजून स्पष्टता समोर आलेली नाही.

तुतारीच्या सभेत घड्याळाचा माणूस
दिंडोरी तालुक्यातील तिसगावमध्ये ही बैठक होती. उमेदवार भास्कर भगरेंच्या मांडीला मांडी लावून नरहरी झिरवाळ तेथे बसलेले या फोटोत दिसत आहेत. दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्याने झिरवाळ नाराज असावेत का अशीही चर्चा आहे.

खेळ ना कुणाला दैवताचा कळला?
अजित पवार गटाने जेव्हा बंड केले तेव्हा त्यातील काही आमदारांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे व दैवतच राहतील असे म्हटलं होते. त्यामुळे ही लोक जरी महायुतीत असली तरी शरद पवारांच्याच हिशोबाने काम चालते का? अशी एक चर्चा असून खेळ ना कुणाला दैवताचा (शरद पवारांचा) कळला असेही गमतीने म्हणत आहेत.